Ind vs Ban: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना 'येथे' फ्रीमध्ये पहा लाईव्ह, 'या' 9 भाषांमध्ये घ्या कॉमेंट्रीची मजा
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अवघ्या तासांत सुरु होणार आहे. या टूर्नामेंटचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. तर, भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या खेळाची सुरुवात करेल. यावेळी रोहित शर्मा आणि नझमुल हुसेन शांतो हे कर्णधार म्हणून एकमेकांसमोर येतील.
HP Laptop: गेमिंगची मजा आता आणखी वाढणार! HP ने भारतात लाँच केला नवा लॅपटॉप, किंमत वाचून फुटेल घाम
भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना सर्वांना पाहण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की तुम्ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची लाईव्ह स्ट्रीमिंग फ्रीमध्ये पुठे पाहू शकता. एवढचं नाही तर या मॅचमध्ये तुम्ही विविध 9 भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याची मजा देखील घएऊ शकता.(फोटो सौजन्य – Pinterest)
भारत विरुद्ध बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामना गुरुवार, 20 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. तर आजचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा असणार आहे. तुम्ही भारत विरुद्ध बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. हा सामना भारतात JioHotstar अॅप आणि वेबसाइटद्वारे लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. तुम्ही JioHotstar वर फ्रीमध्ये हा सामना पाहू शकता. पण तुम्हाला हाय क्वालिटी कंटेटची मजा घ्यायची असेल तर तुम्हाला काही पैसे भरावे लागणार आहेत.
JioHotstar नेटवर्क आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहे. यामध्ये 16 फीड्स आणि 9 भाषांमध्ये स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलगू आणि कन्नड यांचा भाषांचा समावेश असणार आहे. हे मल्टी-कॅम फीड्स, इंडियन साइन लँग्वेज आणि डिस्क्रिप्टिव कॉमेंट्री देखील ऑफर करते.
तुम्हाला भारत विरुद्ध बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामना हाय क्वालिटी व्हिडीओमध्ये पाहण्याची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही पैसे भरावे लागणार आहे. तुम्ही मोबाइल, सुपर आणि प्रिमियम असे तीन सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करून हाय क्वालिटी कंटेटची मजा घेऊ शकता.
जर तुमच्याकडे Disney+ Hotstar किंवा JioCinema चे सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्हाला भारत विरुद्ध बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामना हाय क्वालिटी व्हिडीओमध्ये पाहण्याचा आनंद मिळणार आहे. याव्यतिरिक्त, 949 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर, जिओ आता 90 दिवसांच्या कालावधीसाठी जिओहॉटस्टारचे ad-supported सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही या प्रीपेड प्लॅनसह JioHotStar चा मोफत प्रवेश देखील मिळवू शकता. तथापि, हे फक्त मोबाईल सबस्क्रिप्शन असेल.