Tech Tips: तुमच्या मृत्यूनंतर Gmail अकाउंटचं काय होतं? वैयक्तिक माहिती कशी ठेवाल Safe? जाणून घ्या सोप्या Tricks
आपण आपले वेगवेगळ्या कामांसाठी जीमेल वापर करतो. विशेषतः जीमेल अकाउंट ऑफिस किंवा प्रोफेशनल कामांसाठी वापरले जाते. जॉबसाठी अप्लाय करायचं असेल किंवा मॅनेजरकडून सुट्टी मागायची असेल, यावेळी सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे मेल करणं. तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला तिथे शेकडो मेल दिसतील, काही मेल तुमच्या कामाचे असतात, काही मेल्स स्पॅम असतात. जे इमेल आपल्यासाठी महत्त्वाचे असते त्यांना आपण सेव्ह करून ठेवतो, तर नको असलेले ईमेल लगेच डिलीट करून टाकतो.
सहसा आपण आपले जीमेल अकाउंट कोणासोबत शेअर करत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जीमेल अकाउंटचं काय होईल? तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जीमेल अकाउंटचा ऍक्सेस कोणाकडे जाईल किंवा तुमचं जीमेल अकाउंट कसे डिलीट केले जाईल याबाबत तुम्हाला माहिती आहे का? (फोटो सौजन्य – Pinterest)
90 टक्क्याहून अधिक लोकांना माहिती नसतं की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीमेल अकाउंटचं काय होणार आहे. तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये अनेक महत्त्वाची माहिती असते जसे की तुमचे बँकिंग डिटेल्स, तुमची पीएफ अकाउंटची माहिती आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटची माहिती. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचे जीमेल अकाउंट एखाद्या चुकीच्या हाती पडू नये. त्यामुळे अनेकांना ही चिंता सतत सतावत असते, की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीमेल अकाउंटच काय होणार आहे.
तुमच्या मृत्यूनंतर जर तुमचं जीमेल अकाउंट दीर्घ काळासाठी इनऍक्टिव्ह असेल तर गुगल तुमचं जीमेल अकाउंट डिलीट करू शकतो. याचं कारण म्हणजे दिर्घ काळासाठी इन ऍक्टिव्ह असलेले अकाउंट गुगल आपोआप डिलीट करतो. नवीन आणि अपडेट झालेला पॉलिसीनुसार जर एखादं जीमेल अकाउंट दोन वर्षांसाठी इनऍक्टिव्ह असेल तर हे जीमेल अकाउंट गुगल आपोआप डिलीट करतो. या जीमेल अकाउंटमध्ये सेव्ह असलेले अकाउंट होल्डरचे नाव, पत्ता ईमेल फोटो डॉक्युमेंट्स गुगल ड्राईव्ह इत्यादी सर्व माहिती डिलीट केली जाते.
जर तुमचा जीमेल अकाउंट गुगलद्वारे डिलीट केले जाणार असेल तरी गुगल संबंधित युजरला अनेकदा नोटोफिकेशन पाठवतो. यामुळेच एखाद्या युजरला त्याच्या अकाउंटची गरज असेल तर तो ऍक्टिव्ह येईल, त्यामुळे जीमेल अकाउंट गुगलद्वारे डिलीट केले जाणार नाही. मात्र नोटिफिकेशननंतर युजर्सकडून कोणतीही ऍक्टिव्हिटी झाली नाही तरी गुगल त्याचे जीमेल अकाउंट कायमचे डिलीट करून टाकतो. गुगलद्वारे एकदा डिलीट झालेले जीमेल अकाउंट पुन्हा रिट्रीव्ह जाऊ शकत नाही.
तुमच्या मृत्यूनंतर किंवा तुमच्या अनुपस्थितीत गुगल तुमचे जीमेल अकाउंट डिलीट करतो. यामागील मुख्य उद्देश म्हणजे तुमचं अकाउंट चुकीच्या हाती पडू नये आणि कोणीही त्याचा गैरवापर करू नये. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जीमेल अकाउंटचा एक्सेस तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडे द्यावा तर तुम्ही अशा लोकांची निवड करून काही सेटिंग फॉलो करू शकता. ज्यामुळे तुमच्या मृत्यूनंतर किंवा तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या जीमेल अकाउंट एक्सेस संबंधित व्यक्तीकडे जाईल.
गुगल अकाउंट डीऍक्टिव्हेट करण्यासाठी तीन महिने, सहा महिने, बारा महिने किंवा 18 महिने असं कालावधी निवडला जाऊ शकतो. जेव्हा तुमचा हा कालावधी पूर्ण होतो तेव्हा गुगल तुम्हाला जीमेल आणि नोटिफिकेशनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. कारण युजर्सकडून यानंतर जीमेल अकाउंटमध्ये कोणतीही हालचाल जाणवली नाही तर गुगल संबंधीत जीमेल अकाउंट डीऍक्टिव्हेट करते.
तुम्ही अशा दहा लोकांची निवड करू शकता ज्यांना तुमचे अकाउंट इनॲक्टिव्ह असल्यास नोटिफिकेशन पाठवली जाईल. सेटिंगमध्ये ऍड पर्सन मध्ये जाऊन तुम्ही ठरवू शकता की कोणत्या व्यक्तींना तुमच्या जीमेल अकाउंटचे अॅक्सेस द्यायचं आहे. यासाठी तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीची माहिती आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. तुमचा अकाउंट जेव्हा इन ॲक्टिव्ह असेल तेव्हा ते डिलीट करायची की नाही हे तुम्ही देखील ठरवू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमची जीमेल अकाउंट देता, तेव्हा त्याला ठराविक काळाची मुदत दिली जाते. या काळात संबंधित व्यक्ती तुमच्या जीमेल अकाउंटमधील डेटा डाऊनलोड करू शकतो आणि ठराविक काळानंतर तुमचे जीमेल अकाउंट डिलीट केले जाईल.