तुम्ही कुठे आहात, काय करताय... काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?
तुमचा Wi-Fi तुम्हाला ट्रॅक करू शकतो, असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार आहे का? तुम्ही काय करताय, कुठे उभे आहात, कुठे बसला आहात, ही सर्व माहिती Wi-Fi ट्र्रॅक करू शकतो. होय, हे खरं आहे. हे सर्व ऐकूण तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा प्रसंग आठवला असेल. मात्र आता हा प्रसंग सत्यात उतरणार आहे. आता Wi-Fi तुम्हाला ट्रॅक करू शकणार आहे. रोमच्या La Sapienza यूनिवर्सिटीच्या रिसर्चर्सने असा दावा केला आहे की, Wi-Fi मधून येणारे सिग्नलच्या मदतीने खोलीतील व्यक्तिच्या हालचाली ट्रॅक केल्या जाऊ शकतात. यासाठी WhoFi टेक्नोलॉजीचा वापर केला जातो.
WhoFi टेक्नोलॉजी कोणत्याही कॅमेरे, माइक्रोफोन आणि इतर डिव्हाईसशिवाय काम करते. ही टेक्नोलॉजी खोलीतील उपस्थित असलेल्या व्यक्तिच्या हालचाली ट्रॅक करते, असा दावा करण्यात आला आहे. व्यक्तिंच्या हालचालीने ही टेक्नोलॉजी वायरलेस सिग्नलमध्ये होणारे बदल अगदी सहज ओळखते. WhoFi टेक्नोलॉजी कशी काम करते, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Wi-Fi सिग्नल जेव्हा कोणत्याही खोलीत पसरतात, तेव्हा भिंती, फर्नीचर आणि माणसं यांसारख्या ऑब्जेक्ट्सवर आदळते आणि त्यामध्ये समाविष्ट होतात. यानंतर प्रत्येक व्यक्तीचे शरीर, त्याचा आकार, उंची, चाल या सिग्नलवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते. WhoFi हे बदल ओळखते. ते सिग्नलचे “एम्प्लीट्यूड” आणि “फेज” सारखे तांत्रिक पैलू रेकॉर्ड करते आणि नंतर न्यूरल नेटवर्कद्वारे व्यक्तीचे नमुने ओळखते.
या डेटासेटला रिसर्चर्स NTU-Fi असं म्हटलं जात, जे वाय-फाय सेंसिंग टेक्नोलॉजीमध्ये स्टँडर्ड टेस्टिंगमध्ये वापरले जाते. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत किंवा वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतरही खोलीतील व्यक्ती ओळखण्यासाठी त्यांनी या सिस्टमला प्रशिक्षित केले आहे. एखाद्या व्यक्तीची पुन्हा ओळख पटवण्यात या तंत्रज्ञानाची अचूकता 95.5 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही टेक्नोलॉजी फायदेशीर असली तरी देखील आता युजर्सच्या प्रायव्हसीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या टेक्नोलॉजीची खासियत म्हणजेच, हे ना फोटो क्लिक करते आणि ना आवाज रेकॉर्ड करते. त्यामुळे ही टेक्नोलॉजी जास्त प्रायव्हसी-फ्रेंडली मानली जात आहे. परंतु धोका पूर्णपणे टळलेला नाही. कारण ही टेक्नोलॉजी कोणाच्याही उपस्थिती किंवा हालचाली त्यांच्या नकळत ट्रॅक करू शकते, त्यामुळे गोपनीयता आणि संमतीबद्दल अनेक नैतिक प्रश्न उपस्थित होतात. याच्या मदतीने अगदी सहजपणे लोकांवर नजर ठेवली जाऊ शकते.
रिसर्चर्सने असा दावा केला आहे की, WhoFi टेक्नोलॉजी कोणत्याही व्यक्तीची बायोमेट्रिक किंवा वैयक्तिक माहिती थेट गोळा करत नाही. परंतु या टेक्नोलॉजीच्या मदतीने लोकांचे घर, कार्यालये किंवा सार्वजनिक ठिकाणी ट्रेस केले जाऊ शकतात. सध्या ही टेक्नोलॉजी केवळ रिसर्च लॅबपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. ही टेक्नोलॉजी कोणत्याही सरकारी किंवा व्यावसायिक पातळीवर लागू केलेले नाही. परंतु प्रत्येक घरात आणि शहरात वाय-फाय सामान्य होत असल्याने, अशा सिस्टम स्मार्ट सिक्योरिटी, हेल्थ मॉनिटरिंग आणि होम ऑटोमेशनमध्ये वापरल्या जाऊ शकतात.