फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? फोनमध्ये आत्ताच डाऊनलोड करा हे ॲप, पंतप्रधान मोदींनीही दिलाय सल्ला
वीकेंड सुरू झाला आहे. वीकेंडला प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅनिंग करत असतात. कोणी धबधब्यावर जातात तर कोणी ट्रॅकिंगसाठी जातात. पण कोणत्याही ठिकाणी फिरायला जाण्यापूर्वी त्या ठिकाणच्या वातावरणाबाबत जाणून घेणं अत्यंत महत्वाचं असत. आता आम्ही तुम्हाला एका सरकारी ॲपबद्दल सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती मिळवू शकता.
एप्रिल महिन्यात झालेल्या मन की बातच्या 121 व्या एपिसोडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक ‘सचेत’ (Sachet App) नावाच्या ॲपचा उल्लेख केला होता. हे एक सरकारी ॲप आहे, जे वीज पडणं, स्तूनामी आणि भूकंपासारख्या काही नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती देते. देशात पावसाळा सुरु झाला आहे. शहर आणि गावातील अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. आता आम्ही तुम्हाला अशा एका ॲपबद्दल सांगणार आहोत, जे नैसर्गिक आपत्तीबाबत आधीच माहिती देते. (फोटो सौजन्य – Google Play Store)
Sachet App नेशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (NDMA) चे डिजास्टर वॉर्निंग पोर्टल आणि मोबाइल ॲप आहे. याचे सर्वात महत्वाचे फीचर म्हणजे हे ॲप देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीबाबत रियल-टाइम अलर्ट देते. पाऊस असो किंवा स्तूनामी, किंवा भूकंप, Sachet App लवकरात लवकर युजर्सपर्यंत क्रिटिकल वॉर्निंग पोहोचवते.
सतर्कतेव्यतिरिक्त, सचेत अॅप आपत्तीपूर्वी, दरम्यान आणि नंतर काय करावे याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे देखील देते. भूकंप असो, पूर असो, चक्रीवादळ असो किंवा उष्णतेची लाट असो, हे अॅप सोपे आणि व्यावहारिक सल्ला देते. ज्यामुळे युजर्सचा जीव वाचण्यासाठी मदत होते.
काय सांगता! जुलै महिन्यात पडणार स्मार्टफोनचा पाऊस, मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी या कंपन्या सज्ज
हे अॅप देशातील प्रत्येक नागरिकाला वापरता यावं, यासाठी यामध्ये मल्टी-लँग्वेज सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच हे अॅप विविध भाषांना सपोर्ट करते. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, ते इतर अनेक प्रादेशिक भाषांना देखील सपोर्ट करते. यामुळे देशाच्या विविध भागातील लोकांना महत्त्वाची माहिती सहजपणे समजण्यास मदत होते.