भारतात WhatsApp ची मोठी कारवाई! 98 लाखाहून अधिक अकाउंट केले बॅन, काय आहे कारण? वाचून तुमचेही उडतील होश
मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग ॲप WhatsApp मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. हे मेसेजिंग ॲप त्यांच्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी करत असते. यामागील उद्देश म्हणजे युजर्सची सुरक्षा टिकून राहावी आणि त्यांना ॲपचा वापर करताना कोणतीही अडचण येऊ नये. वेळोवेळी नवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी करण्यासोबतच WhatsApp फेक अकाउंट आणि स्कॅमर्सवर देखील सतत कारवाई करत असते. अशीच एक कारवाई आता पुन्हा एकदा करण्यात आली आहे. WhatsApp ने भारतात 98 लाखांहून अधिक अकाउंट बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2025 मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच
प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग आणि युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बॅन करण्यात आलेल्या अकाउंटपैकी 19 लाखांहून अधिक अकाउंट्स यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव सस्पेंड करण्यात आले होते. हे असे अकाउंट आहेत ज्याबाबत यूजर्सकडून सतत तक्रार केली जात होती. आता अखेर WhatsApp ने या अकाऊंटवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. WhatsApp च्या मंथली कंपलाईन्स रिपोर्टनुसार जूनमध्ये 23,596 अकाउंट बाबत तक्रार केली होती. ही तक्रार अकाउंट सपोर्ट बॅन अपील आणि प्रोडक्ट संबंधित होती. यूजर्सने केलेल्या या तक्रारीनंतर कंपनीने 1001 घटनांमध्ये त्वरित कारवाई केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp यूजर्सची सुरक्षा टिकून राहावी, यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते. स्पॅम, फेक न्यूज आणि इतर फ्रॉडपासून युजर्सना दूर ठेवण्यासाठी कंपनी अनेक अपडेट्स जारी करत असते. कंपनीचं असं मत आहे की नुकसान झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा नुकसान होण्याआधीच कारवाई करणे चांगलं आहे आणि या कारवाईसाठी कंपनी सतत युजर्सकडून फीडबॅक घेत असते.
WhatsApp चा दुरुपयोग रोखण्यासाठी तयारी करण्यात आलेली सिस्टम यूजरचे अकाउंट लाइफसायकल तीन टप्प्यांमध्ये तपासते
हे ऑटोमॅटिक टूल्स एक तज्ञांच्या टीमद्वारे हँडल केले जाते. WhatsApp च्या या निर्णयाचा असा उद्देश आहे की युजर्सची सुरक्षा टिकून राहावी आणि त्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा केला जाऊ नये. WhatsApp चे करोडो अॅक्टिव्ह युजर्स आहेत. या युजर्सना टार्गेट करण्यासाठी आणि त्यांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सकडून वेळोवेळी नवीन पद्धती वापरल्या जातात. काही युजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात, ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आणि हीच फसवणूक टळावी यासाठी WhatsApp असे अकाउंट्स वेळोवेळी बॅन करण्याचा निर्णय घेत असते. अकाउंटचा गैरवापर, स्पॅम आणि धोकादायक अॅक्टिव्हिटी गोखण्यासाठी WhatsApp वेळोवेळी असे अकाउंट बॅन करत असते.