
WhatsApp Data Leak: तुमचा नंबर लीक नाही झाला ना? सर्वच भारतीयांचा व्हॉट्सअॅप डेटा धोक्यात, अशी करा तुमची सुरक्षा
सिक्योरिटी रिसर्चर्सने सांगितलं आहे की, ते 3.5 अब्जाहून अधिक सक्रिय WhatsApp खात्यांशी संबंधित फोन नंबर स्क्रॅप करण्यात यशस्वी झाले, ज्यामध्ये सुमारे 75 करोड भारतीय यूजर्स होते, हा आकडा जगात सर्वाधिक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट म्हणजे रिसर्चर्स 62 टक्के (किंवा 46.5 करोड) भारतीय यूजर्सचे पब्लिकली दिसणारे WhatsApp प्रोफाइल फोटो मिळवण्यात, यासोबतच ‘About’ टेक्स्ट, कंपॅनियन-डिव्हाईस यूसेज, बिजनेस अकाऊंट इंफॉर्मेशन आणि दूसरी प्रोफाइल डीटेल्स मिळवण्यात देखील त्यांना यश आले आहे. (फोटो सौजन्य – istockphoto)
रिसर्चर्सने सांगितलं आहे की, त्यांनी WhatsApp कॉन्टॅक्ट डिस्कवरी फीचरच्या मदतीने भलामोठा डेटाबेस तयार केला आहे. रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्टॅक्ट-डिस्कवरी फीचर यूजर्सना दुसऱ्या यूजर्सना शोधण्यासाठी आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी मदत करणार आहे. मात्र या फीचरचा चूकीचा वापर देखील केला जाऊ शकतो, ज्यामुळे यूजर्सचा डेटा धोक्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मच्या XMPP एंडपॉइंट्सचा गैरवापर करणाऱ्या प्रगत तंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात WhatsApp प्रोफाइल डेटा गोळा करण्यासाठी याचा गैरवापर केला जाऊ शकतो.
3.5 अब्ज अकाउंट्सपैकी, रिसर्चर्सना 57 टक्के यूजर्सचे पब्लिक प्रोफाइल फोटो स्क्रॅप करण्यात यश आले. ब्राझीलमध्ये, आढळलेल्या 206 मिलियन WhatsApp-लिंक्ड नंबरपैकी 61 टक्के नंबरमध्ये सार्वजनिक प्रोफाइल फोटो होते. भारतानंतर हा दुसरा सर्वात मोठा आकडा आहे.
WhatsApp चे प्राइवेसी-फोकस्ड ऑप्शन Signal ने गेल्यावर्षी एक नवीन फीचर जोडलं होतं. या फीचरच्या मदतीने यूजर्स फोन नंबर शेअर केल्याशिवाय एक यूनिक यूजरनेम बनवू शकतात. यासोबतच यूजर्स त्यांचा फोन नंबर हाईड करू शकतात, जेणेकरून इतर कोणताही यूजर त्यांना नंबरवरून शोधू शकणार नाही किंवा चॅट सुरू करू शकणार नाही.
WhatsApp मध्ये यूजर त्यांचे प्रोफाइल डिटेल केवळ कॉन्टॅक्स किंवा नोबडीसाठी विजिबल सेट करू शकता. यासोबतच साइलेंस अननोन कॉलर आणि टू-स्टेप वेरिफिकेशन ऑन ठेवा. WhatsApp वेळोवेळी जारी करत असलेले रिमाईंडर्स फॉलो करा आणि नेहमी तुमची सेटिंग अपडेट ठेवा. स्कॅमर्सना थांबवण्यासाठी रेट-लिमिटिंग आणि मशीन-लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करा.
Ans: WhatsApp वरून किंवा तृतीय पक्ष अॅप्समुळे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर किंवा डार्क वेबवर लीक होणे म्हणजे Data Leak.
Ans: प्रोफाइल फोटो, फोन नंबर, स्टेटस, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन (कधीकधी), क्लाउड बॅकअपमधील चॅट डेटा
Ans: एन्क्रिप्शन सुरक्षित आहे, पण डिव्हाइस असुरक्षित असेल तर चॅट लीक होऊ शकतात.