Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

WhatsApp updates: WhatsApp वरील सर्व वैयक्तिक कॉल्सप्रमाणेच, लाँच करण्यात आलेल्या नवीन वैशिष्ट्यांसह एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देखील लागू केले जाईल. याचा अर्थ असा की तुमचे ग्रुप कॉल्स पूर्णपणे सुरक्षित आणि खाजगी असतील.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 16, 2025 | 11:56 AM
WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही...

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही...

Follow Us
Close
Follow Us:

व्हाट्सअप हे सध्याच्या काळात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ॲप आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ऑफिसला जाण्याच्या लोकांपर्यंत सर्वजण व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअपवर त्यांच्या युजरसाठी अनेक नवीन फीचर्स उपलब्ध आहेत. त्या फीचर्सद्वारे युजर्सचा अनुभव सतत बदलत असतो. व्हाट्सअप मेसेजिंग, कॉल्स आणि स्टेटसमध्ये सतत नवीन फीचर्स जोडले जात आहेत. आता देखील कंपनी त्यांची युजरसाठी एक नवं आणि अनोखा फीचर घेऊन आली आहे. हे फीचर व्हाट्सअप कॉलिंगसाठी आहे. आता युजर्सचा व्हाट्सअप कॉलिंगमधील अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी

व्हाट्सअप ग्रुपमधील कॉल पहिल्यापेक्षा अधिक सोपा, इंटरॲक्टिव आणि ऑर्गनाइज बनवण्यासाठी कंपनी एक नवीन फीचर घेऊन आली आहे. या फीचरमध्ये कॉल शेड्युलिंग, इंटरव्हेटिव टूल्स आणि कॉल लिंक सारख्या सुधारणांचा समावेश आहे. यामुळे युजर्स आधीच कॉल प्लॅन करू शकणार आहेत आणि त्यांची इतर कामं मॅनेज करू शकतील. ज्यामुळे जेव्हा कॉल करायचा असेल तेव्हा युजर वेळ काढून ग्रुपमधील इतर लोकांशी संवाद साधू शकतील आणि त्यांना यावेळी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

शेड्युलिंग, इंटरॅक्टिव्ह टूल्स आणि कॉल लिंक अपडेट हे सर्व फीचर्स जगभरातील व्हाट्सअप युजर्ससाठी हळूहळू रोल आउट केले जात आहेत. हे नवं फीचर लाँच करण्याचा उद्देश असा आहे की कॅज्युअल ग्रुप चॅट, ग्रुप कॉल, प्रोफेशनल मीटिंग ह्या सर्व गोष्टी आणखी मजेदार आणि प्रॉडक्टिव्ह व्हाव्यात,

कॉल शेड्युल करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत, सगळ्यात आधी व्हाट्सअप ओपन करा आणि कॉल टॅब्समधून कॉल शेड्युल करा.

  • कॉल टॅबमधील प्लस बटणावर क्लिक करा आणि कॉल शेड्युल सिलेक्ट करा
  • तुम्हाला तारीख आणि वेळ टाकण्याचा ऑप्शन दिसेल तुमच्या हिशोबाने इथे तारीख आणि वेळ निवडा
  • आता ग्रुपमधील लोकांना इन्व्हाईट करण्यासाठी कॉलची लिंक ग्रुपवर शेअर करा
  • तुम्ही शेड्युल केलेले कॉल हे कॉल टॅबमध्ये दिसतील ज्यामध्ये अटेंडी लिस्ट आणि कॅलेंडरमध्ये ऍड करण्याचा ऑप्शन दिसेल
  • कॉल सुरू होण्यापूर्वी सहभागी होणाऱ्या सर्व युजर्सना एक नोटिफिकेशन पाठवले जाईल ज्यामुळे कॉल मिस होण्याची शक्यता कमी होणार आहे

Vivo V60 vs OnePlus Nord 5: कोण गाजवणार मार्केट आणि कोण करणार स्मार्टफोन युजर्सच्या मनावर राज्य? जाणून घ्या कोण आहे खरा बादशाह

तुम्ही शेड्युल केलेले सर्व कॉल्स एकाच ठिकाणी कॉल टॅब मध्ये दिसणार आहेत. ही कॉलिंग लिंक तुम्ही ग्रुप वरती किंवा इतर लोकांची शेअर करू शकता. फॅमिली गेट टुगेदर किंवा ऑफिस मीटिंगसाठी हे फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तसेच कंपनीने व्हाट्सअप कॉलिंगमध्ये हॅन्ड रेस आणि रिएक्शन्स देखील जोडल्या आहेत. ज्यामुळे आता कॉलिंग आणखी मजेदार होणार आहे. जर समोरचा व्यक्ती बोलत असेल आणि तुम्हाला तुमचे मत मांडायचे असेल तर तुम्ही हॅन्ड रेस चा वापर करू शकता.

Web Title: Whatsapp is planning to roll out new feature for whatsapp calling tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
1

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
2

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
3

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण
4

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.