Xiaomi 17 Pro Series: टेक लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, Xiaomi चे तुफानी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! काय आहे खास?
Xiaomi 17 Pro आणि Xiaomi 17 Pro Max चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेले हे लाईनअप Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि Android 16-बेस्ड HyperOS सह येतात. प्रो मॉडेल्समध्ये रियर कॅमेरा मॉड्यूलच्या चारी बाजूला सेकेंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे.
Xiaomi 17 Pro Max च्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 5,999 म्हणजेच सुमारे 74,700 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,299 म्हणजेच सुमारे 78,500 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 87,200 रुपये ठेवण्यात आली आहे.
तसेच Xiaomi 17 Pro च्या 12GB + 256GB कॉन्फिगरेशनची किंंमत CNY 4,999 म्हणजेच सुमारे 62,300 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 66,000 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,599 म्हणजेच सुमारे 69,700 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 74,700 रुपये ठेवण्यात आली आहे.
Xiaomi 17 Pro Max मध्ये 6.9-इंच आणि Xiaomi 17 Pro मध्ये 6.3-इंच मेन डिस्प्ले देण्यात आला आहे. Pro Max व्हेरिअंट 2K रेजोल्यूशन आणि Xiaomi Dragon Crystal Glass प्रोटेक्शनसह येतो. स्मार्टफोन्समध्ये मागील बाजूस सेकेंडरी M10 डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 3,500 निट्स ब्राइटनेस आहे. याचा वापर अलार्म सेट करण्यासाठी, AI पोर्ट्रेट्स, AI पेट्स आणि दूसऱ्या फीचर्ससाठी केला जाऊ शकतो.
‘Magic Back Screen’ च्या मदतीने यूजर्स रियर मेन कॅमेराने सेल्फी क्लिक करू शकतात. तुम्ही इतरांनी घेतलेल्या शॉट्सचे प्रीव्यू करू शकता. नवीन ‘पोस्ट-इट नोट्स’ वैशिष्ट्यामुळे त्यांना फक्त एका टॅपने महत्त्वाची माहिती मागील स्क्रीनवर पिन करण्याची सुविधा मिळेल. एक अतिरिक्त केस फोनला हँडहेल्ड गेम कन्सोलमध्ये देखील बदलू शकतो. Xiaomi 17 Pro हँडसेट्स Qualcomm च्या 3nm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज आहेत. जो 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह येतो. हे Android 16-बेस्ड HyperOS 3 वर चालतो,ज्यामध्ये Dynamic Island सारखा HyperIsland फीचर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Xiaomi 17 Pro Max आणि Xiaomi 17 Pro मध्ये Leica-ट्यून ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. दोन्ही फोनमध्ये 50MP प्राइमरी Light Hunter 950L सेंसर, 50MP अल्ट्रावाइड शूटर आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (5x ऑप्टिकल जूम सपोर्टसह) देण्याच आसा आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50MP कॅमेरा आहे.
Xiaomi 17 Pro मध्ये 6,300mAh बॅटरी आहे. तर Pro Max व्हेरिअंटमध्ये 7,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. प्रत्येक हँडसेट 8 मिमी जाडीचा आणि 192 ग्रॅम वजनाचा आहे. Xiaomi 17 प्रो मॅक्स आणि Xiaomi 17 प्रो दोन्हीमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहेत. हे फोन 5G, 4G, ब्लूटूथ, वाय-फाय, GPS, NFC आणि USB टाइप-सी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतात. यामध्ये UWB (अल्ट्रा-वाइडबँड) तंत्रज्ञान देखील आहे.