
Free Fire Max: फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस! गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट, 'ही' गन स्कीन मिळणार मोफत
फ्री फायर मॅक्समध्ये XM8 X MAC10 Ring इवेंट सुरू झाला असून हा इव्हेंट गेममध्ये पुढील 9 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्सना XM8 स्क्रीमिंग चिकी आणि XM8 सिनिस्टर पम्पकिन गन स्किन सारख्या प्रीमियम गन स्किन मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे प्लेअर्सना या गन स्किन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डायमंड खर्च करण्याची देखील गरज नाही. तुम्ही इव्हेंटमध्ये सहभागी होऊन या गन स्किन पूर्णपणे मोफत मिळवू शकता. हा एक लक रॉयल इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना इन गेम करन्सी डायमंड खर्च करावे लागणार आहेत. स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार आहेत याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube)
फ्री फायर मॅक्सच्या XM8 X MAC10 Ring इव्हेंट मध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. 5 वेळा स्पिन करण्याची किंमत शंभर डायमंड आहे मात्र या इव्हेंटमध्ये प्लेयर्स 90 डायमंड्स खर्च करून पाच वेळा स्पिन करू शकतात.