Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या
Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
ओप्पो रेनो 15 5G भारतात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहे. या व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपये आहे. हा फोन ट्वायलाइट ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि ऑरोरा ब्लू कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर रिअलमी 16 प्रो प्लस 5G स्मार्टफोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 44,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मास्टर ग्रे, मास्टर गोल्ड आणि कॅमेलिया पिंक कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ओप्पो रेनो 15 5G च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 200MP प्राइमरी कॅमेरा (OIS सपोर्ट), 50MP टेलीफोटो सेंसर, 50MP अल्ट्रा-वाइड एंगल लेंस, 50MP फ्रंट कॅमेरा (सेल्फी आणि व्हिडीओ कॉललाठी) देण्यात आला आहे. रिअलमी 16 प्रो प्लस 5G च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 200MP प्राइमरी कैमरा (OIS सपोर्ट), 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड एंगल लेंस, 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
ओप्पो रेनो 15 5G मध्ये 6.32-इंच AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3600 निट्स पीक ब्राइटनेस दिली आहे. कंपनीच्या या प्रिमियम डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 8450 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये अँड्रॉईड 16 आधारित OS आहे. ओप्पो रेनो 15 5G मध्ये 6200mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग सपोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.
रिअलमी 16 प्रो प्लस 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायंच झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.8-इंच मोठा डिस्प्लेसह 144Hz रिफ्रेश रेट आणि 6500 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. Realme 16 Pro Plus 5G Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉईड 16 OS वर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 7000mAh बॅटरीसह 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
जर तुम्हाला कॉम्पॅक्ट डिझाईन आणि बॅलेंस्ड परफॉर्मेंस पाहिजे असेल तर ओप्पो रेनो 15 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. तर तुम्हाला मोठी स्क्रीन, जास्त ब्राईटनेस आणि मोठी बॅटरी पाहिजे असेल तर तुमच्यासाठी रिअलमी 16 प्रो प्लस 5G ची निवड योग्य ठरणार आहे.






