Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक

Smartphone WIFI Tips: तुम्ही देखील स्मार्टफोनमधील वायफाय सेटिंग सतत चालू ठेवताय का? जर हो, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण स्मार्टफोनचा वायफाय सतत चालू ठेवणं अत्यंत धोकादायक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 26, 2025 | 10:02 PM
Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक

Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक

Follow Us
Close
Follow Us:
  • Wi-Fi सतत ऑन ठेवता?
  • ही एक सवय तुमच्यासाठी ठरू शकते मोठा धोका!
  • Wi-Fi ऑन ठेवल्याने बॅटरीच नव्हे तर प्रायव्हसीही धोक्यात
आपण स्मार्टफोन हातात घेतला की सर्वात आधी वायफाय चालू करतो. काहीवेळेस आपण स्मार्टफोनमधील वायफाय बंद करायला विसरतो. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनमधील वायफाय सतत चालूच राहतो आणि आपला फोन नेहमी वायफायच्या शोधात असतो. तुम्हाला देखील स्मार्टफोनमधील वायफाय सतत चालू ठेवण्याची सवय आहे का? जर हो, तर वेळीच सावध व्हा. कारण तुमची ही सवय तुमच्या स्मार्टफोनसाठी अतिशय धोकादायक आहे.

आपत्कालीन प्रसंगी Google ठरणार तारणहार! भारतात लाँच झाली इमरजेंसी लोकेशन सर्विस, यूजर्सना अशी मिळणार मदत

घराबाहेर पडताना जर तुमच्या स्मार्टफोनचा वायफाय तुम्ही बंद करायला विसरलात, तर तुमचा फोन एखाद्या अनोळखी आणि धोकादायक नेटवर्कला कनेक्ट होऊ शकतो. ज्यामुळे पासवर्ड, बँकिंग डिटेल्स, आणि तर महत्त्वाची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अनेक रिसर्चमध्ये देखील असा खुलासा झाला आहे की, सतत नेटवर्क स्कॅन करणारे स्मार्टफोन खोटे नेटवर्क किंव मॅन-इन-द-मिडल सारख्या खोट्या सायबर अटॅकमध्ये अडकतात. त्यामुळे घरातून बाहेर पडताना आपल्या स्मार्टफोनचा वायफाय बंद आहे की नाही याची खात्री करणं अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आपल्या छोट्या – छोट्या सवयींमुळेच आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा टिकून राहते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Wi-Fi सतत ऑन ठेवल्यास सर्वात मोठा धोका

ऑटो-कनेक्शन फीचर घराबाहेर वायफाय ऑन ठेवणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. या फीचरमुळे तुमचा स्मार्टफोन एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, कॅफे, सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या वायफायला तुमचा स्मार्टफोन कनेक्ट होतो. हे Wi-Fi नेटवर्क कोणत्याही एन्क्रिप्शन उलबध असतात. म्हणजेच इथे तुमचा स्मार्टफोन अगदी सहज हॅक केला जाऊ शकतो. जर तुमचा स्मार्टफोन अशा वायफाय नेटवर्कला कनेक्ट असेल तर तुमचा पासवर्ड, बँकिंग डिटेल्स, मेसेज सर्वकाही धोक्यात येऊ शकतं.

हॅकर्स सहसा लोकांना फसवण्यासाठी एअरपोर्ट फ्री वाय-फाय किंवा कॅफे गेस्ट नेटवर्क सारख्या खोट्या नेटवर्कचा वापर करतात. अशा नेटवर्कला कोणताही पासवर्ड नसतो त्यामुळे फोन अगदी लगेच या नेटवर्कला कनेक्ट होतात. जर तुमचा फोन अशा नेटवर्कला कनेक्ट झाला तर तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाऊ शकतो आणि यामुळे हॅकर्स तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करतात आणि तुमची लॉगिन माहिती देखील चोरतात.

‘DNA सिद्ध करा आणि करोडोंची संपती मिळवा’… टेलीग्राम फाऊंडर Pavel Durov ने केली अजब घोषणा, सोशल मीडियावर खळबळ

तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा वाढावी आणि तुमचा डेटा सुरक्षिता राहावा यासाठी तुम्हाला काही सवयी बदलणं अत्यंत आवश्यक आहे. घराबाहेर पडताना तुमच्या स्मार्टफोनचा वायफाय बंद असल्याची खात्री करा. पब्लिक वायफायवर कोणतेही व्यवहार करू नका. स्टेशन, एअरपोर्ट, कॅफे अशा ठिकाणी उपलब्ध असलेला पब्लिक वायफाय तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट करणं टाळा. तुमच्या स्मार्टफोनचा ऑटो-कनेक्ट फीचर अनोळखी नेटवर्ससाठी डिसेबल करा. स्मार्टफोनमधील जुने वायफाय नेटवर्क डिलीट करा. बँकिग संबंधित व्यवहार करण्यासाठी स्मार्टफोनधील इंटरनेट डेटा किंवा VPN चा वापर करा. वायफाय तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे.

Web Title: You also keep smartphone wifi always on it will be dangerous know how tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 10:02 PM

Topics:  

  • free WiFi
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!
1

फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!

Free WiFi: एअरपोर्टवर कसे वापराल मोफत इंटरनेट? भारतीय फोन क्रमांकाशिवाय वापरू शकता Internet, जाणून घ्या सोपी पद्धत
2

Free WiFi: एअरपोर्टवर कसे वापराल मोफत इंटरनेट? भारतीय फोन क्रमांकाशिवाय वापरू शकता Internet, जाणून घ्या सोपी पद्धत

लॅपटॉपच्या Charger चे फोनचे चार्जिंग करणं योग्य आहे का? याचं उत्तर माहीत हवंच नाहीतर येईल पश्चात्तापाची वेळ
3

लॅपटॉपच्या Charger चे फोनचे चार्जिंग करणं योग्य आहे का? याचं उत्तर माहीत हवंच नाहीतर येईल पश्चात्तापाची वेळ

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक
4

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.