Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर

आपण दिवसभरात अनेक वेबसाईट्सना भेट देतो. प्रत्येक कामासाठी एक वेगळी वेबसाईट वापरली जाते. पण तुम्ही वापरत असलेली वेबसाईट खरी आहे की बनावट हे तुम्हाला माहिती आहे का? सोप्या पद्धतीने याबाबत जाणून घेऊ शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 08, 2026 | 09:06 AM
एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • स्कॅमर्सनी थेट सर्वोच्च न्यायालयासारखी एक बनावट वेबसाईट तयार केली
  • खऱ्या आणि खोट्या वेबसाईटमधील फरक कसा ओळखू शकतो?
  • स्कॅमर्स खऱ्या नावाला मिळते-जुळते असणारे लांब नाव त्यांच्या वेबसाईटसाठी तयार करतात
देशभरात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे सायबर सुरक्षा अधिक मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी अधिक मजबूत पद्धती घेऊन येत आहेत. अलीकडेच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की, लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सनी थेट सर्वोच्च न्यायालयासारखी एक बनावट वेबसाईट तयार केली.

यूजर्सच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! अनोख्या डिझाईनसह Motorola Signature 27 ची दमदार एंट्री; फीचर्स पाहताच म्हणाल, कमालच…..

ही बनावट वेबसाईट अगदी खऱ्या वेबसाईटसारखी दिसत होती, ज्यामुळे सामान्य माणसांना खऱ्या आणि खोट्या वेबसाईटमधील फरक ओळखणं अत्यंत कठीण होऊ शकतं. ही बाब समोर येताच, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने देशभरातील लोकांना सावध करण्यासाठी त्वरित एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर

स्कॅमर्सनी आता थेट सर्वोच्च न्यायालयाला लक्ष केले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. कारण सध्याच्या डिजीटील काळात अनेक कामं इंटरनेटद्वारे केली जातात. यासाठी विविध वेबसाईट्सचा वापर केला जातो. पण तुम्ही वापरत असलेली वेबसाईट नकली असेल तर? आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, एक सामान्य माणूस खऱ्या आणि खोट्या वेबसाईटमधील फरक कसा ओळखू शकतो? याबाबत आता काही टिप्स जाणून घेऊया.

लक्षात ठेवा या सोप्या टिप्स

  • भारतातील कोणत्याही सरकारी किंवा न्यायालयीन वेबसाईटच्या अखेरी नेहमी .gov.in किंवा .nic.in लिहीलेले असते. मात्र सायबर गुन्हेगारांनी तयार केलेल्या वेबसाईटच्या अखेरीस .com, .net किंवा .top लिहीलेले असते.
  • स्कॅमर्स खऱ्या नावाला मिळते-जुळते असणारे लांब नाव त्यांच्या वेबसाईटसाठी तयार करतात, ज्यामुळे लोकं गोंधळतात आणि त्यांना खऱ्या आणि खोट्या वेबसाईटमधील फरक लगेच समजत नाही.
  • मेसेज किंवा टेक्स्टवर आलेली कोणतीही लिंक ओपन करण्याऐवजी गूगलला भेट देऊन स्वत: वेबसाईटचे नाव टाईप करा.
  • कोणत्याही अधिकृत वेबसाईटची यूआरएल https:// ने सुरु होते.
  • अधिकृत वेबसाईटच्या यूआरएलच्या सुरुवातीला लॉकचे चिन्ह दिसते. यावर क्लिक करून सुरक्षा प्रमाणपत्र तपासले जाऊ शकते.
  • अधिकृत वेबसाईटवर खरा पत्ता, ग्राहक सेवा क्रमांक, अधिकृत ईमेल आयडी आणि अबाऊट अज असे पर्याय उपलब्ध असतात. मात्र हे पर्याय बनावट वेबसाईटवर उपलब्ध नसतात.
दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

चुकून खोट्या वेबसाईट वापरल्या?

  • जर तुम्ही चुकून स्कॅमर्सनी बनवलेली खोटी वेबाईसट वापरली तर सर्वात आधी तुमच्या बँकेला कळवा आणि त्यांना संपूर्ण प्रकार सांगा. तुमचे अकाऊंट आणि कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा.
  • अकाऊंट, जिमेल, सोशल मीडिया, बँकिंग ॲप्सचे पासवर्ड बदला.
  • नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर संपूर्ण घटनेची तक्रार दाखल करा.
💡

Frequently Asked Questions

  • Que: बनावट वेबसाईट कशी ओळखता येते?

    Ans: वेबसाईटची URL, डोमेन नाव, संपर्क माहिती आणि सुरक्षा प्रमाणपत्र तपासून ती खरी आहे की बनावट, याचा अंदाज घेता येतो.

  • Que: सरकारी वेबसाईटची URL कशी असते?

    Ans: भारतातील अनेक अधिकृत सरकारी वेबसाईटच्या URL मध्ये .gov.in किंवा .nic.in हे डोमेन असते. मात्र, केवळ डोमेन पाहून खात्री न करता अधिकृत सरकारी स्रोतावरून लिंक तपासावी.

  • Que: वेबसाईटच्या URL मध्ये HTTPS असणे सुरक्षिततेची खात्री देते का?

    Ans: नाही. HTTPS कनेक्शन सुरक्षित असल्याचे दर्शवते; पण वेबसाईट अधिकृत किंवा विश्वासार्ह असल्याची हमी देत नाही.

Web Title: Know the easy tips to identify fake websites and avoid cyber scams hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा
1

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या ‘Temple’ ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या ‘Temple’ ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर
3

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर

Vi ची AI क्षेत्रात मोठी झेप! ‘Vi Intelligence’ उपक्रमाची घोषणा; ग्राहकांसह उद्योगांचाही अनुभव बदलणार
4

Vi ची AI क्षेत्रात मोठी झेप! ‘Vi Intelligence’ उपक्रमाची घोषणा; ग्राहकांसह उद्योगांचाही अनुभव बदलणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.