Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube करत आहे नवीन ‘प्ले समथिंग’ बटणाची टेस्टिंग, असा होणार युजर्सना फायदा

Google च्या मालकीचे YouTube हे जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म सुधारण्यासाठी कंपनी आता नवीन प्ले समथिंग फीचरची टेस्टिंग करत आहे. युजर्सना याचा काय फायदा होईल ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 29, 2024 | 08:09 AM
YouTube करत आहे नवीन 'प्ले समथिंग' बटणाची टेस्टिंग, असा होणार युजर्सना फायदा

YouTube करत आहे नवीन 'प्ले समथिंग' बटणाची टेस्टिंग, असा होणार युजर्सना फायदा

Follow Us
Close
Follow Us:

युट्युब हे जगातील सर्वोत्तम व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर जगभरातील लाखो युजर्स जोडलेले आहेत. परंतु, काहीवेळा युजर्सना यावर योग्य व्हिडिओ शोधण्यात अडचण निर्माण होते. ज्यामुळे, एंडलेस स्क्रोलिंगची समस्या दूर करण्यासाठी, युट्युब नवीन ‘प्ले समथिंग’ फ्लोटिंग ॲक्शन बटणाची टेस्टिंग करत आहे. 9to5Google च्या अलीकडील अहवालानुसार, नवीन ‘प्ले समथिंग’ बटण काळ्या बॅग्राऊंड आणि बॉटम बारच्या अगदी वर पांढरा मजकूर दिसतो. रिपोर्टनुसार, बटणावर टॅप केल्याने शॉर्ट्स प्लेयरमध्ये एक रँडम व्हिडिओ सुरू होतो. हे बटण पोर्ट्रेट मोडमध्ये देखील नियमित कंटेंट प्ले करू शकते, स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसणारी लाईक, डिसलाइक, कमेंट आणि शेअर बटणे तसेच प्लेअरच्या तळाशी टाइमलाइन स्क्रबर देखील असेल.

तथापि, जेव्हा मिनीप्लेअर ऍक्टिव्ह असतो तेव्हा प्ले समथिंग बटण गायब होते. युट्युबने ‘प्ले समथिंग फीचर’सह (Play Something Feature) एक्सपेरिमेंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2023 मध्ये, एका Reddit युजरने एक बॅनर पाहिला ज्यावर लिहिले होते, ‘काय पाहायचे ते ठरवू शकत नाही?’ आणि तळाशी ‘प्ले समथिंग बटण’ दिसत होते.

स्मार्टफोनच्या चार्जरची Expiry Date काय आहे? अशाप्रकारे होईल खऱ्या-खोट्याची ओळख

नवीन ‘प्ले समथिंग’ बटण सर्व युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल हे सध्या स्पष्ट झाले नाही. परंतु असे दिसते की Google स्वतःच अद्याप ते सुरू ठेवायचे की नाही हे ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, युट्युबने जाहीर केले की, ते एक नवीन इंप्रूवमेंट्स आणि फिचर जारी करणार आहेत, ज्यात प्ले लिस्टसाठी थंबनेल सेट करणे, स्लीप टाइमर सेट करणे आणि पुन्हा डिझाइन केलेले मिनी-प्लेअर यासह अनेक नवीन सुधारणा सामील आहेत.

फोनची घंटी वाजताच ऐकू येईल कॉलरचे नाव,फक्त ही एक सेटिंग ऑन करा

नाही चालणार क्लिकबेट

युट्युबशी संबंधित इतर बातम्यांबद्दल बोलताना, प्लॅटफॉर्मने अलीकडेच घोषणा केली होती की, ते दिशाभूल करणारे टाइटल आणि थंबनेल असलेल्या व्हिडिओंवर कारवाई करेल. खरं तर, प्रेक्षक जेव्हा प्लॅटफॉर्मला भेट देतात तेव्हा त्यांना विश्वासार्ह अनुभव मिळावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. विशेषत: न्यूज आणि इवेंट्सवाले कंटेंटसाठी असे करण्यात येत आहे. यानुसार युट्युब, ज्या व्हिडिओंचे टायटल किंवा थंबनेलमध्ये सांगितलेल्या गोष्टी वास्तविक व्हिडिओमध्ये नसल्या तर अशा व्हिडिओंविरोधात युट्युब आपली कठोरता वाढवण्याची तयारी करत आहे. यासह, युजर्सना योग्य कंटेंट पाहता येईल आणि त्यांच्या कोणत्याही रीतीने फसवणूक होणार नाही.

Web Title: Youtube experimenting with new play something button know the benefits of these feature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 08:09 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.