Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube ला मिळालं मोठं अपडेट, Netflix आणि Prime Video सारखा दिसणार आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लेटफॉर्म

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube मध्ये एक मोठा बदल होणार आहे. अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की कंपनी आता सबस्क्रिप्शन-आधारित सामग्रीवर अधिक लक्ष केंद्रित करेल. यूट्यूबचा लेआउट पुन्हा डिझाइन केला जाईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 05, 2025 | 07:45 PM
YouTube ला मिळालं मोठं अपडेट, Netflix आणि Prime Video सारखा दिसणार आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लेटफॉर्म

YouTube ला मिळालं मोठं अपडेट, Netflix आणि Prime Video सारखा दिसणार आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लेटफॉर्म

Follow Us
Close
Follow Us:

YouTube हे जगातील लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिंमिग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. युट्यूबचे 491 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. युट्यूब त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स सादर करत असतो. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट सादर केलं आहे. या अपडेटमुळे युट्यूबचं इंटरफेस बदलणार आहे. रिपोर्ट्सनुसार, YouTube आता नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओप्रमाणे थर्ड-पार्टी कंटेंटचा समावेश त्यांच्या प्लॅटफॉर्मवर करण्याची योजना आखत आहे.

BGMI Pro Tips: तुम्हालाही गेमप्ले सुधारून PUBG चा प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच करा या 5 ढासू सेटिंग

YouTube मध्ये नवीन फीचर्सचा समावेश केला जातोय

YouTube वर लवकरच थर्ड-पार्टी कंटेंट आणि एक नवीन डिझाइन सादर केली जाणार आहे. त्यामुळे युट्यूबचा लूकच आता बदलणार आहे. टेक रिपोर्ट्सनुसार, YouTube लवकरच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर Paramount आणि Max सारख्या थर्ड-पार्टी पेड सेवा जोडणार आहे. यामुळे यूजर्सना त्यांचे आवडते शो आणि चित्रपट YouTube वरच पाहता येतील. (फोटो सौजन्य – Pinterest)

तथापि, ही एक नवीन संकल्पना नाही. 2022 मध्ये, YouTube ने त्यांच्या चित्रपट आणि टीव्ही विभागात ‘Primetime Channels’ फीचर लाँच केले होते. या फीचरअंतर्गत, SHOWTIME, STARZ, Paramount Plus, Vix Plus आणि AMC Plus सारख्या 30 हून अधिक सेवांमधील कंटेंट उपलब्ध करून देण्यात आला. परंतु, कमी युजर्सच्या इंटरेक्शनमुळे हे वैशिष्ट्य फारसे लोकप्रिय झाले नाही.आता, YouTube पुन्हा एकदा त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये थर्ड-पार्टी कंटेट एकत्रित करण्याची योजना आखत आहे, परंतु यावेळी ते एका नवीन आणि आकर्षक डिझाइनसह सादर केलं जाणार आहे.

YouTube ची नवीन रचना

आता YouTube चा लूक Prime Video आणि Disney+ सारखा असेल. एका नवीन अहवालात असे समोर आले आहे की YouTube आपला इंटरफेस पूर्णपणे बदलण्याची योजना आखत आहे. त्याची नवीन रचना अशी असेल की ती Amazon Prime Video आणि Disney+ सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करू शकेल.

नवीन इंटरफेसमध्ये, शो आणि चित्रपट वेगवेगळ्या ओळींमध्ये दाखवले जातील, ज्यामुळे यूजर्सना कंटेंट शोधणे सोपे होईल. YouTube च्या Primetime Channels सेक्शनला देखील पूर्णपणे नवीन रूप मिळेल, जिथे सर्व पेड कंटेंट एकाच ठिकाणी एक्सेस करता येईल. यासोबतच, YouTube मध्ये आणखी एक नवीन वैशिष्ट्य जोडण्याची योजना आखली जात आहे, ज्याद्वारे क्रिएटर्स वेगवेगळ्या शो पेजमध्ये त्यांचा कंटेट मॅनेज करू शकतील. यामुळे वेब सिरीज आणि एपिसोडवर आधारित कंटेंट शोधणे सोपे होईल.

नवीन अपडेट कधी उपलब्ध होईल

अहवालानुसार, YouTube आणि थर्ड-पार्टी कंटेंट इंटिग्रेशनची ही नवीन डिझाइन येत्या काही महिन्यांत लाँच केली जाईल. त्याच्या मदतीने, युजर्सना एक चांगला स्ट्रीमिंग अनुभव मिळेल आणि YouTube ला एक ऑल-इन-वन व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनवले जाणार आहे. त्यामुळे आता युट्यूब युजर्सना एक नवीन अनुभव मिळणार आहे.

iPhone 16e नंतर आता Apple पुन्हा लाँच करणार नवीन गॅझेट, या आठवड्यातच होणार एंट्री! Tim Cook ने शेयर केला टीजर

YouTube ने म्हटले आहे की 12 मे पासून, व्हिडिओंमध्ये नैसर्गिक ब्रेकपॉइंट्सवर जाहिराती दिसतील. याचा अर्थ असा की, आत्ताच, व्हिडिओच्या मध्यभागी कुठेही जाहिराती सुरू होतात. हे बदलून, आता कंपनी कोणत्याही सीन किंवा डायलॉगच्यामध्ये जाहिराती दाखवणार नाही. आता या जाहिराती सीनच्या ट्रांजिशनदरम्यान थांबवल्या जातील. यामुळे व्हिडिओ पाहण्याचा अनुभव सुधारेल आणि निर्मात्यांच्या कमाईतही वाढ होईल.

Web Title: Youtube get new update now video streaming platforms interface similar to netflix prime video tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार
1

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
2

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
3

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
4

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.