Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युट्यूब क्रिएटर्ससाठी आलं नवीन फीचर! आता चॅनल शेअर करणं होणार अधिक सोपं

तुम्ही YouTube क्रिएटर आहात का? ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने YouTube क्रिएटरसाठी एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर तुमच्या चॅनेलचा रिच वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. YouTube चॅनल QR कोड असे या फीचरचे नाव आहे. हा QR कोड स्कॅन करून, इतर YouTube युजर्सना थेट तुमच्या चॅनेलवर प्रवेश मिळेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 29, 2024 | 11:38 AM
युट्यूब क्रिएटर्ससाठी आलं नवीन फीचर! आता चॅनल शेअर करणं होणार अधिक सोपं (फोटो सौजन्य - pinterest)

युट्यूब क्रिएटर्ससाठी आलं नवीन फीचर! आता चॅनल शेअर करणं होणार अधिक सोपं (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube ने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर YouTube क्रिएटर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं कारण ह्या फीचरच्या मदतीने क्रिएटर्स त्यांचा YouTube चॅनेल इतरांसोबच शेअर करण्यास सक्षम असतील ज्यामुळे त्यांच्या सबस्क्राईबर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. हे नवीन फीचर म्हणजे तुमच्या YouTube वरील चॅनलचा QR कोड असेल.

हेदेखील वाचा- Google AI युट्युबर्सना मदत करणार! YouTube वरील अकाऊंट रिकव्हर करणं आता आणखी सोपं होणार

आता तुम्हाला तुमच्या YouTube चॅनेलचा QR कोड मिळणार आहे. हा QR कोड तुम्ही इतरांसोबत शेअर करून आपल्या सबस्क्राईबर्सची संख्या वाढवू शकता. तुम्ही शेअर केलेला QR कोड स्कॅन करताच पेजवर तुमचं YouTube चॅनल ओपन होईल. यामुळे तुमच्या चॅनेलवरील व्ह्यूज देखील वाढतील. YouTube क्रिएटर्स चॅनल शेअरिंगसाठी मदत व्हावी, याच उद्देशाने हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. या नवीन फीचरसह, युजर्स त्यांचे चॅनल त्यांचे मित्र, कुटुंब आणि फॉलोअर्ससह शेअर करू शकतात. यासाठी इतर YouTube युजर्सना हा QR कोड स्कॅन करावा लागेल.

चॅनल QR कोड कसा काम करेल?

चॅनल शेअरिंगसाठी, YouTube युजर्स चॅनलच्या मुख्य पृष्ठावरून हा QR कोड ऍक्सेस करू शकतील. YouTube वापरकर्ता हा QR कोड सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप्स आणि प्रीटेंड मटेरिअलवर शेअर करू शकतो. जेव्हा हा QR कोड दुसऱ्या YouTube वापरकर्त्याद्वारे फोनवरून स्कॅन केला जातो, तेव्हा त्या वापरकर्त्याला ऑटोमॅटिकली YouTube चॅनेलवर रिडायरेक्ट केले जाईल. या फीचरबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, आम्ही YouTube वर सर्व क्रिएटर कम्युनिटींसाठी QR कोड चॅनल लाँच करत आहोत. आम्हाला आशा आहे की या नवीन अपडेटमुळे तुम्ही तुमच्या चॅनेलला तुमचा कंटेट पाहू इच्छित लोकांसोबत सहज शेअर करू शकाल.

हेदेखील वाचा- YouTube Guidelines: YouTube ची नवीन मार्गदर्शक तत्व जारी; AI व्हिडीओसाठी बदलले नियम

अशा प्रकारे शोधा YouTube वरील QR कोड

तुम्ही YouTube क्रिएटर असाल आणि तुमच्या स्वतःच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असाल, तर तुम्ही तुमच्या चॅनलचा QR कोड इतर YouTube युजर्ससोबत शेअर करू शकता-

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोनमध्ये YouTube ओपन करावे लागेल.
  • यानंतर पेजच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइलवर टॅप करावे लागेल.
  • येथे तुम्हाला वरच्या बाजूला असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर पुन्हा टॅप करावे लागेल.
  • आता तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात मेनू पर्यायावर यावे लागेल.
  • आता तुम्हाला मेनूमधून शेअर पर्यायावर टॅप करावे लागेल.
  • आता तुम्हाला येथे QR Code च्या पर्यायावर टॅप करावे लागेल.
  • असे केल्याने तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रीनवर QR कोड दिसेल.
  • सेव्ह टू कॅमेरा रोल वर क्लिक करून तुम्ही QR कोड गॅलरीत सेव्ह करू शकता.

आता हा QR कोड तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक, कुटूंबियांसोबत शेअर करू शकता. यामुळे तुमच्या च्या सबस्क्राईबर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. तसेच तुमच्या चॅनेलवरील व्ह्यूज देखील वाढतील.

Web Title: Youtube has launched new feature for creators how they can easily share youtube channel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • QR Code

संबंधित बातम्या

‘इथं’ QR Code च्या माध्यमातून होतीये कर वसूली; ग्रामपंचायतीचा हायटेक कारभार चर्चेत
1

‘इथं’ QR Code च्या माध्यमातून होतीये कर वसूली; ग्रामपंचायतीचा हायटेक कारभार चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.