
YouTube Shopping Affiliate Program भारतात लाँच, कार्यक्रमाला जागतिक बाजारपेठेत जबरदस्त यश
टेक जायंट कंपनी गुगलने भारतात यूट्यूब शॉपिंगचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने भारतात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे देखील ठरवलं आहे. कंपनीच्या या निर्णयानुसार आता YouTube Shopping Affiliate प्रोग्राम भारतात लाँच झाला आहे. या प्रोग्राममध्ये क्रिएटर्सना त्यांच्या कमाईमध्ये डायवर्सिफाइ करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच आतापर्यंत जे क्रिएटर्स केवळ व्हिडीओ आणि व्लॉगिंगव्दारे पैसे कमावत होते आता त्यांना YouTube Shopping Affiliate प्रोग्राममध्ये देखील कमाईची संधी मिळणार आहे. यामध्ये क्रिएटर्स त्यांच्या व्ह्युवर्ससाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स सुचवू शकतात आणि व्ह्युवर्स देखील क्रिएटर्सने सुचवलेले प्रोडक्ट्स खरेदी करू शकणार आहे.
हेदेखील वाचा- एवढं व्हायरल नव्हतं व्हायचं, मी JioHotstar डोमेनचा कायदेशीर मालक आहे; व्हायरल पोस्टवर डेव्हलपरची प्रतिक्रिया
YouTube Shopping Affiliate प्रोग्राममध्ये क्रिएटर्स त्यांच्या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट्स टॅग करण्यास सक्षम असतील. जर व्ह्युवर्सनी क्रिएटर्सने सुचवलेले प्रोडक्ट्स खरेदी केलं तर त्यांना कमिशन देखील मिळणार आहे. यासाठी YouTube ने Flipkart आणि Myntra सारख्या शॉपिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी कंपनीला आशा आहे. या कार्यक्रमाला यापूर्वी जागतिक बाजारपेठेत जबरदस्त यश मिळालं आहे.
YouTube Shopping प्रोग्राम वैशिष्ट्यासाठी एलिजिबल क्रिएटर त्यांच्या व्हिडिओंमध्ये प्रोडक्ट्सना टॅग करून थेट प्रचार करण्यास सक्षम असतील. यासह, ते YouTube चॅनेलवर त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्ट्सच्या लिंक्सचा प्रचार करू शकतात. YouTube Shopping Affiliate प्रोग्रामसह, क्रिएटर जाहिरात कमाई, YouTube Premium आणि चॅनल सदस्यत्व, सुपर थँक्स, सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स यांसारखी इतर वैशिष्ट्ये मिळवू शकतात. यासाठी कंपनीने Flipkart आणि Myntra सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
यूट्यूब शॉपिंगचे जनरल मॅनेजर और वाइस प्रेसिडेंट ट्रॅव्हिस कॅट्झ म्हणाले की, YouTube शॉपिंग जागतिक स्तरावर खूप लोकप्रिय होत आहे. फक्त 2023 मध्ये, YouTube वर 30 अब्ज तास खरेदी-संबंधित कंटेट पाहिली गेली. हे सध्याच्या काळातील क्रिएटर्स, व्यूअर्स आणि ब्रँडची कनेक्टिंग पॉवर प्रतिबिंबित करते. आता आम्ही हे फीचर भारतात लाँच करणार आहोत. यासाठी आम्ही Flipkart आणि Myntra सोबत भागीदारी केली आहे.
हेदेखील वाचा- ॲपलला मोठा धक्का! या देशात iPhone 16 वर बंदी, सरकारने केली मोठी कारवाई, धक्कादायक कारण आले समोर
त्यांनी पुढे सांगितंल की, या वैशिष्ट्याद्वारे आम्ही प्रोडक्ट डिस्कवरीचा एक नवीन टप्पा सुरू करत आहोत. जे क्रिएटर्स आणि व्यूअर्स यांच्यातील मजबूत संबंधाने प्रेरित आहे. YouTube Shopping Affiliate प्रोग्राम भारतीय क्रिएटर्सना त्यांची रिव्यू वाढवण्याच्या अद्वितीय संधी प्रदान करेल. याद्वारे ते त्यांच्या व्यूअर्ससोबत एक मजबूत संबंध निर्माण करू शकतील.
Flipkart आणि Myntra दीर्घ काळापासून व्हिडिओ कॉमर्स वापरत आहेत, ज्यासाठी त्यांना क्रिएटर्स आणि ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच कंपनीने Myntra Minis, Ultimate Glam Clan आणि Flipkart Affluencer सारखे कार्यक्रम सुरू केले आहेत. आपल्या उत्तम अनुभवातून, कंपनीने YouTube सोबत हातमिळवणी केली आहे.
फ्लिपकार्टचे सामाजिक आणि व्हिडिओ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवी अय्यर यांनी या भागीदारीबद्दल सांगितले की आमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे ज्यामुळे आम्ही ग्राहकांमध्ये विविधता आणू शकू. आमच्याकडे Flipkart आणि Myntra सोबत मिळून 500 दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत ग्राहक आहेत. त्यांच्यासाठीही ही एक चांगली संधी आहे.