एक असा किल्ला जिथे आजही अश्वत्थामा रोज भगवान शिवाची पूजा करण्यासाठी येतो, अद्वितीय आहे जागा
कथा आणि इतिहास जितके जुने तितके लोक त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास अधिक उत्सुक असतात. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, एका किल्ल्याची गोष्ट ज्याच्याशी संबंधित अनेक रंजक तथ्य प्रसिद्ध आहेत. आम्ही बोलत आहोत मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात असलेल्या असीरगड किल्ल्याबद्दल, ज्याने आपल्या काळातील अनेक लढाया, कालखंड आणि राजवट पाहिली आहे. हा किल्ला सातपुडा पर्वत रांगेत, जिल्हा मुख्यालयापासून 20 किमी अंतरावर, इंदूर इच्छापूर महामार्गावर, सुमारे 250 मीटर उंचीवर आहे.
किल्ल्याशी संबंधित अनेक रोमांचक गोष्टी आहेत ज्या निश्चितच ऐकण्याजोग्या आहेत. असे म्हणतात की, ज्यानेही आपल्या ताकदीवर या किल्लाला जिंकण्याचा प्रयत्न केला त्याच्या हाती पराभवच आला. कदाचित तुम्हालाही हे ऐकून धक्का बसेल पण याबद्दल असेही म्हटले जाते की, आजही अश्वत्थामा येथे दररोज भगवान शिवाची पूजा करण्यासाठी येतो. या कल्ल्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हैराण करतील. आज या लेखात आपण या किल्याबाबतच्या या सर्व गोष्टी विस्तारपूर्वक जाणून घेणार आहोत.
भारतातील अशी काही ठिकाणे जिथे चुंबकासारख्या खेचल्या जातात गोष्टी, गाड्या स्वतःच वर चढू लागतात
… असे पडले किल्ल्याला नाव
इतिहासकारांच्या मते हा किल्ला रामायण काळात म्हणजेच 14व्या शतकात बांधला गेला होता. तुम्ही विचार करत असाल की याला असीरगड हे नाव कसे पडले, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, याच्या मागे एक कथा आहे. असे म्हणतात की आता जिथे असीरगड किल्ला आहे तिथे एकेकाळी आशा अहिर नावाची व्यक्ती आली होती, ज्यांच्याकडे हजारो प्राणी होते. त्या व्यक्तीने प्राण्यांच्या संरक्षणासाठी विटा, माती आणि चुनखडीने भिंती बांधल्या होत्या. या कथेनुसार या किल्ल्याला असीरगड किल्ला असे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते. चौहान घराण्यातील राजांनी येथे दीर्घकाळ राज्य केल्याचे सांगितले जाते.
इथे येतात अश्वत्थामा
असे म्हटले जाते की, महाभारत आणि किल्ल्याचा एक अनोखा संबंध आहे, त्यातील एक अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा होता, ज्यांनी कौरव आणि पांडवांना शस्त्रे शिकवली. वडिलांच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाला श्रीकृष्णाने युगानुयुगे भटकण्याचा शाप दिला होता. लोकांचा असा विश्वास आहे की गडावर 5 हजार लोक भटकत होते. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तो किल्ल्यात असलेल्या गुप्तेश्वर मंदिरात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी येतो, असेही सांगितले जाते. बरं, या सर्व गोष्टी लोकांच्या मान्यता आहेत, अद्याप यातील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करण्यात आलेली नाही.
तीन भागांत विभागलेला आहे किल्ला
किल्ला तीन भागात विभागलेला असून वरचा भाग असीरगड, मधला भाग कामरगड आणि खालचा भाग मलयगड आहे. हा किल्ला 60 एकरात पसरलेला आहे, किल्ल्यामध्ये 5 तलाव आहेत, परंतु हे तलाव कधीही आणि कोणत्याही ऋतूत कोरडे पडत नाहीत. येथे गंगा आणि यमुना नावाचे दोन तलाव देखील आहेत, असे म्हटले जाते की शत्रूंना मारल्यानंतर त्यांना या तलावांमध्ये टाकण्यात आले होते. उंचीवरून पाहिल्यास येथे मंदिर आणि मशीदही दिसेल. मंदिराच्या आजूबाजूला खोल खड्डे आहेत, पण उंचीवर नजर टाकली तर झाडांनी वेढलेले हे खड्डे खूप सुंदर दिसतात.
किल्ल्याला कसे जात येईल?
असीरगड हा किल्ला मध्य प्रदेशातील बुरहानपूरपासून 20 किमी अंतरावर आहे. 20 किमीचा हा छोटा प्रवास तुम्ही लोकल ट्रेनच्या मदतीने देखील करू शकता. बुरहानपूरचे सर्वात जवळचे विमानतळ इंदूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, रेल्वे मार्गासाठी तुम्ही बुरहानपूर रेल्वे स्टेशनचीही मदत घेऊ शकता.