गोवा-मनाली नाही तर 'ही' धार्मिक स्थळ बनली लोकांची पहिली पसंती! अहवालातून धक्कादायक खुलासा
भारताची सफर करायचं म्हटलं की, सर्वात आधी आपल्या मनात गोवा-मनाली या प्रसिद्ध ठिकाणांचे नाव डोळ्यासमोर येऊ लागते. मात्र नुकताच OYO कंपनीने एक अहवाल जारी केला आहे ज्यात वर्षभरात सर्वाधिक भेट दिलेल्या स्थळांची नावे सामोर आली. यात सार्वधिक भेट दिलेल्या ठिकाणांमध्ये भारतातील काही प्रमुख धार्मिक स्थळांनी बाजी मारली. लोकांनी वर्षभरात देशातील धार्मिक स्थळांना आपली पहिली पसंती बनवले आहे. यात कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते जाणून घेऊयात.
OYO च्या ‘Travelopedia 2024’ च्या वार्षिक अहवालानुसार, पुरी, वाराणसी आणि हरिद्वार ही सर्वाधिक भेट दिलेली धार्मिक स्थळे आहेत. तर हैदराबाद हे या वर्षी भारतातील सर्वाधिक बुक झालेले शहर आहे. या अहवालात प्रवासाचे नमुने आणि अहवालांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या अहवालात संपूर्ण वर्षाचे ट्रॅव्हल टेक बुकिंग डेटा देखील समाविष्ट करण्यात आला आहे.
भारत धार्मिक स्थळांचे मुख्य केंद्र बनले आहे
OYO च्या मते, धार्मिक स्थळे भारतातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र राहिले आहेत. या अहवालात पुरी, वाराणसी आणि हरिद्वार ही सर्वात जास्त तीर्थक्षेत्रे असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर देवघर, पालणी, गोवर्धन या अध्यात्मिक स्थळांना कमी लोकांनी भेट दिली आहे.
गोवा नव्हे तर या धार्मिक स्थळांवर लोक अधिक फिरत आहेत
हैदराबादनंतर, बेंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता ही शहरे बुकिंग यादीत अव्वलस्थानी आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत उत्तर प्रदेशने प्रथम क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकमधूनही भरपूर बुकिंग झाले आहे. पाटणा, राजमुंद्री आणि हुबळी या छोट्या शहरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या अहवालाच्या आधारे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही की, बुकिंगमध्ये वर्षानुवर्षे 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भारतातील या ठिकाणी लोक सर्वाधिक देतात भेट
OYO ने म्हटले आहे की, या वर्षी सुट्ट्यांमध्ये खूप लोकांनी प्रवास केला आहे. यात जयपूर देखील मागे नाही. हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे, त्यानंतर गोवा, पाँडिचेरी आणि म्हैसूर सारखी सदाहरित आवडती ठिकाणे आहेत. विशेष म्हणजे मुंबईत बुकिंगमध्ये घट दिसून आली. OYO चे ‘ग्लोबल चीफ सर्व्हिस ऑफिसर’ श्रीरंग गोडबोले म्हणाले, 2024 हे जागतिक प्रवासाच्या दृष्टिकोनातून खूप वेगळे वर्ष ठरले आहे. सणासुदीच्या काळात बुकिंग खूप जास्त असते.