चीनचे हे गाव आजही न सुटलेले कोडेच! अर्ध्या लोकसंख्येची उंची 3 फुटांपेक्षा कमी
उंची हा माणसांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. एकीकडे, उंच लोकांना निरोगी आणि सशक्त मानले जाते तर लहान लोकांची अनेकदा थट्टा उडवली जाते. आपल्या परिवारात किंवा मित्र परिवारात एखादा व्यक्ति असा असतो ज्याची उंची कमी असते, परंतु संपूर्ण गाव जर लहान माणसांनी भरले असेल तर? होय, आम्ही चीनमधील एका रहस्यमय गावाबद्दल बोलत आहोत जिथे गावातील अर्ध्या लोकसंख्येची उंची 3 फूटांपेक्षा कमी आहे. या गावाच नाव आहे यांगसी गाव. गावातील या रहस्याचं कोडं अजून शास्त्रज्ञांना देखील सुटलेलं नाही.
हेदेखील वाचा- ही 5 ठिकाणं आहेत ऐतिहासिक अवशेषांच्या सौंदर्याची उदाहरणं, वास्तुकला आणि कोरीव काम पाहून आश्चर्यचकित व्हाल
आज आम्ही तुम्हाला चीनमधील यांगसी या गावाविषयी सांगणार आहोत, जिथे बहुतेक लोक सरासरी उंचीपेक्षा खूपच लहान आहेत. या रहस्यमय गावात बौनेपणाचे कारण आजपर्यंत शास्त्रज्ञांसाठीही एक मोठे रहस्य आहे. या गावाबद्दल अशा काही गोष्टी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल.
अनेकदा लहान व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोक त्यांना चिडवतात, तर अनेकजण अशा लोकांना कमकुवत मानतात, पण चीनच्या या गावात निम्म्याहून अधिक लोकसंख्येची उंची 3 फुटांपेक्षा कमी आहे. या गावाला चीनचे लहान लोकांचे गाव मानले जाते.
चीनच्या सिचुआन प्रांतातील एका दुर्गम भागात यांगसी नावाचे एक गाव आहे, जे आपल्या खास वैशिष्ट्यासाठी जगभर ओळखले जाते. या गावातील जवळपास निम्मी लोकसंख्या बौने लोकांची आहे. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले! येथील 80 लोकांपैकी सुमारे 36 लोक फक्त 2 फूट 1 इंच ते 3 फूट 10 इंच उंच आहेत. म्हणूनच याला ‘बौनांचे गाव’ असे म्हणतात. या गावातील इतके लोक लहान का आहेत, याचे रहस्य गेल्या 67 वर्षांपासून शास्त्रज्ञ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वी येथील लोक अगदी सामान्य होते, परंतु काही दशकांपूर्वी या भागात एक गूढ रोग पसरला, त्यानंतर येथे जन्मलेल्या मुलांची उंची वाढणे थांबले.
हेदेखील वाचा- लग्नागाठ बांधण्यासाठी भारतातील ही 6 मंदिरे आहेत सर्वोत्तम, विशेष प्रसंग ठरेल अविस्मरणीय
यांगसी गावात लहान लोक दिसायला 1911 पासूनच सुरुवात झाली. तथापि, 1951 मध्ये लोकांचे हातपाय लहान झाल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्यावर या समस्येकडे अधिकृत लक्ष वेधले गेले. 1985 च्या जनगणनेत या गावात अशी सुमारे 119 प्रकरणे नोंदवली गेली. या रहस्यमय आजाराचे कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक दशके संशोधन केले आहे. त्यांनी गावातील पाणी, माती आणि अन्नपदार्थांचीही तपासणी केली, परंतु त्यांना कोणताही ठोस पुरावा मिळू शकला नाही. या गावातील लोकांची उंची वाढणे का थांबले हे आजपर्यंत न सुटलेले गूढ आहे.
चीन सरकारने यांगसी गावाचे अस्तित्व कधीच नाकारले नाही, परंतु हे गाव बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात आले आहे. येथे कोणत्याही परदेशी व्यक्तीला येण्याची परवानगी नाही. स्थानिक लोक या गावाला दुष्ट शक्तीचा कोप मानतात. हे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक अभ्यास केले आहेत. गावातील जमिनीत पाऱ्याचे प्रमाण खूप जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
जमिनीत असलेल्या विषारी घटकांमुळे येथील लोकांची उंची वाढत नसल्याची शक्यता आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानने सोडलेल्या विषारी वायूमुळे हे गाव प्रभावित झाले असावे, असे काही लोकांचे मत आहे. मात्र, आजपर्यंत या गूढतेचे नेमके उत्तर सापडलेले नाही. यांगत्से गाव हे एक रहस्य आहे जे जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधकांना आकर्षित करत आहे.