Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

तेलंगणातील हनमकोंड्यातील रुद्रेश्वर स्वामी मंदिर हजार स्तंभांवर उभे असलेले अद्वितीय स्थापत्य आहे. येथे शिव, विष्णू आणि सूर्य एकाच गर्भगृहात विराजमान असून मंदिराची नंदी मूर्ती विशेष आकर्षण ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2026 | 08:50 AM
1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

Follow Us
Follow Us:
  • तेलंगणात एक अनोखे मंदिर वसले आहे .
  • इथे भगवान शंकर, विष्णू आणि सूर्यदेव विराजमान आहेत.
  • इथली वास्तुकला पर्यटकांना खास करुन आकर्षित करते.
भारताच्या विविध राज्यांमध्ये श्रद्धा, इतिहास आणि रहस्यांनी नटलेली अनेक मंदिरे आहेत. भक्त आपल्या आराध्य देवतेच्या दर्शनासाठी मैलोनमैल पायी चालत येतात आणि भक्तिभावाने पूजा-अर्चना करतात. दक्षिण भारतात भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते. मात्र तेलंगणामधील एक असे अद्वितीय मंदिर आहे, जिथे भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान सूर्य एकाच गर्भगृहात विराजमान आहेत. हजार स्तंभांवर उभारलेले हे मंदिर वास्तुकलेचा अप्रतिम नमुना मानले जाते.

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

रुद्रेश्वर स्वामी मंदिर

तेलंगणा राज्यातील हनमकोंडा येथे प्रसिद्ध हजार स्तंभांचे मंदिर आहे, ज्याला रुद्रेश्वर स्वामी मंदिर असेही म्हटले जाते. मंदिराची रचना स्तंभांवर आधारलेली असून, त्याला आधार देण्यासाठी भिंतींचा वापर जवळजवळ नाही. काही स्तंभ स्वतंत्रपणे दिसतात, तर काही इतके जवळजवळ जोडलेले आहेत की ते भिंतीसारखे भासतात. काळाच्या ओघात मंदिराची अवस्था जीर्ण झाली होती; मात्र शासनाच्या देखरेखीखाली दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

लोकप्रिय तीर्थक्षेत्र

तारकाकृती (स्टार शेप) रचनेत उभारलेले हे मंदिर आज एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिरात काळ्या बेसाल्ट दगडात साकारलेली भव्य नंदीची मूर्ती विशेष आकर्षण ठरते. मंदिरातील तीन गर्भगृहांना एकत्रितपणे “त्रिकूटालय” असे संबोधले जाते. या गर्भगृहांमध्ये शिव, विष्णू आणि सूर्य देवता एकत्र विराजमान असल्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

उत्सवांची परंपरा

मंदिरात मकरसंक्रांत (पोंगल) निमित्त सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. याशिवाय महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमा, उगादी, नागुला चविती, गणेश चतुर्थी, बोनालू आणि बथुकम्मा यांसारखे सणही येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या काळात मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होते.

Ramdan 2026 : मोहम्मद अली रोडपासून जामा मस्जिदपर्यंत पदार्थांच्या या नगरीत जाताच रंगून जाल

ऐतिहासिक पार्श्वभूमी

या मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकात रुद्रदेव यांनी केले. त्यांच्या आराध्य देवतेच्या नावावरून मंदिराला रुद्रेश्वर स्वामी मंदिर हे नाव प्राप्त झाले. मंदिराची स्थापत्यशैली चालुक्य परंपरेशी साधर्म्य दर्शवते. प्रांगणात कोरलेली हत्ती आणि नंदी महाराजांची भव्य शिल्पे विशाल बेसाल्ट दगडातून घडवली असून, त्यांवरील सूक्ष्म नक्षीकाम प्राचीन शिल्पकलेची साक्ष देते. हजार स्तंभांचे हे मंदिर श्रद्धा, कला आणि इतिहास यांचा संगम घडवणारे एक अद्वितीय स्थळ आहे.

Web Title: This ancient temple stands on 1000 pillars along with vishnu and shankar the surydev is worshipped travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • Religious Places
  • Telangana
  • travel news

संबंधित बातम्या

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
1

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
2

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
3

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals
4

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.