Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच पर्वतावर 800 हून अधिक संगमरवर मंदिर, नक्षीकाम पाहून हैराण होतात लोक…

गुजरातमधील पालिताणा हे शत्रुंजय पर्वतावर वसलेले जैन धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे ८०० हून अधिक संगमरवरी मंदिरे असून दर्शनासाठी ३५०० पायऱ्यांची चढाई करावी लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2026 | 08:23 AM
एकाच पर्वतावर 800 हून अधिक संगमरवर मंदिर, नक्षीकाम पाहून हैराण होतात लोक...

एकाच पर्वतावर 800 हून अधिक संगमरवर मंदिर, नक्षीकाम पाहून हैराण होतात लोक...

Follow Us
Follow Us:
  • धार्मिक पर्यटनाची आवड असल्यास हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे.
  • इथे तुम्हाला एकाच जागी अनेक संगमरवरी मंदिरे पाहण्याचा अनुभव मिळेल.
  • या जागेला मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते.
पालिताणा हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील शत्रुंजय पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेले एक अद्वितीय तीर्थक्षेत्र आहे. ‘मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नगरीला प्राचीन काळी पादलिप्तपुर असे नाव होते. जैन धर्मीयांसाठी हे स्थान अतिशय पवित्र आणि श्रद्धास्थान मानले जाते. या जगाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असेलेले शेकडोहुन अधिक संगमरवरी मंदिरे…

इंडियन टुरिस्टची पहिली पसंत बनत आहे Vietnam, अवघ्या 50,000 रुपयांत घ्या लग्झरी ट्रिपची मजा

८०० हून अधिक संगमरवरी मंदिरे

शत्रुंजय टेकडीवर उभारलेले हे विशाल तीर्थक्षेत्र आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे ८६० पेक्षा अधिक संगमरवरी मंदिरे आहेत, ज्यांची कोरीव रचना आणि स्थापत्यकला अप्रतिम आहे. जैन परंपरेनुसार आयुष्यात किमान एकदा तरी येथे दर्शन घेणे मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाचे मानले जाते. २४ तीर्थंकरांपैकी नेमिनाथ वगळता इतर २३ तीर्थंकरांनी या पर्वताला पावन केले, अशी श्रद्धा आहे.

तपस्येसमान चढाई

मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण ३५०० पायऱ्या चढाव्या लागतात. ही चढाई श्रद्धा, संयम आणि निष्ठेची परीक्षा घेणारी मानली जाते. अनेक भाविक पहाटे लवकर प्रवास सुरू करून सूर्यास्तापूर्वी दर्शन पूर्ण करतात.

रात्री मुक्कामास मनाई

या पवित्र स्थळाला देवतांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे सूर्यास्तानंतर टेकडीवर कोणीही थांबण्यास परवानगी नाही. अगदी मंदिरातील सेवेकरी आणि पुजाऱ्यांनाही संध्याकाळ होण्यापूर्वी खाली उतरावे लागते. या परंपरेमुळे या ठिकाणाची पवित्रता आणि शिस्त आजही जपली गेली आहे.

मुख्य मंदिर आणि धार्मिक महत्त्व

येथील प्रमुख मंदिर पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांना समर्पित आहे. हे स्थान श्वेतांबर मूर्तिपूजक जैन समुदायासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच दिगंबर जैन परंपरेचेही येथे मंदिर आहे. संपूर्ण परिसर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असून त्याची शिल्पकला आणि वास्तुशैली जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

पालिताणा येथे कसे पोहोचावे?

हवाई मार्ग: सर्वात जवळचे विमानतळ भावनगर विमानतळ असून ते पालिताणापासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे.
रेल्वे मार्ग: पालिताणा हे भावनगर तसेच मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे.
रस्ता मार्ग: गुजरातमधील अनेक शहरांमधून पालिताणाकडे जाण्यासाठी उत्तम रस्ते सुविधा उपलब्ध आहेत.
आस्था, स्थापत्यकला आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम अनुभवायचा असेल, तर पालिताणा हे एक अविस्मरणीय तीर्थक्षेत्र ठरते.

 

Web Title: More than 800 marble temples on a single mountain gujrat palitana travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Gujrat
  • Religious Places
  • travel news

संबंधित बातम्या

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
1

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals
2

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट
3

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप
4

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.