इंडोनेशियात पर्यटनात अति वाढिची चिंता; बालीमध्ये हॉटेल्स, क्लब बांधणीवर बंदी
जकार्ता: जगातील सर्वांच्या आवडिचे ठिकाण बालीमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. ज्यामुळे स्थानिक लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या बेटावर जास्त विकास झाला आहे. अशा परिस्थितीत इंडोनेशियाने बेटाची संस्कृती जपण्यासाठी बालीमध्ये नवीन हॉटेल्स, व्हिला आणि नाईट क्लब बांधणीवर सरकारने बंदी घातली आहे. बालीमध्ये अतिविकासामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी असे निर्बंध घालण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पर्यटन सुधारण्याचा मार्ग
बाली हा इंडोनेशियाचा बेट प्रांत आहे. ज्याची राजधानी डेनपसार आहे. हे बेट जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बंदी घालण्यामागचे कारण म्हणजे बालीच्या पर्यटन सुधारण्याचा हा एक मार्ग आहे. बालीची संस्कृती जतन करमए आणि तिचा दर्जा टिकवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. सागरी आणि गुंतवणूक व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी हर्मिन एस्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार बाली बेटावरील बांधकाम निर्बंधांना सरकारने सहमती दर्शविली आहे, परंतु ही बंदी किती काळ लागू राहील याची निश्चित वेळ निश्चित केलेली नाही.
बाली बेटावरील निर्बंध 10 वर्षांसाठी वाढवले जाऊ शकतात. बेटाची स्वदेशी संस्कृती जपत गुणवत्ता आणि नोकऱ्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इंडोनेशियाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असलेल्या बालीवरील पर्यटन सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे.लुहुत यांनी त्यांच्या मागील विधानांमध्ये म्हटले आहे की बाली बेटावर सुमारे 2 लाख परदेशी लोक राहतात, जे गुन्हेगारी आणि अतिविकासाला प्रोत्साहन देत आहेत. यासोबतच परप्रांतीय लोकांना नोकऱ्यांचा प्रश्न भेडसावत आहे.
कोरोना महामारीनंतर पर्यटनात प्रचंड वाढ
कोरोना महामारीनंतर बालीमध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या परिसरात पर्यटकांच्या गैरवर्तनाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात, त्यामुळे परिसरातील नागरिकांचा रोष वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 2.9 दशलक्ष परदेशी पर्यटक बाली विमानतळाद्वारे इंडोनेशियामध्ये आले, जे देशातील एकूण परदेशी आगमनांपैकी 65 टक्के आहे. यासोबतच 2019 मध्ये बालीमध्ये 507 हॉटेल्स होती जी गेल्या वर्षी 2023 मध्ये 541 वर पोहोचली.