
इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसाने पुरस्थिती
महापूर आल्याने तब्बल 16 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना
इंडोनेशिया देशातील नागरिकांसमोर एक मोठे संकट समोर उभे राहिले आहे. इंडोनेशियामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचे त्या ठिकाणी महापूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुसळधार पाऊस सुरू असल्याने इंडोनेशियाच्या काही भागात फ्लॅश फ्लड्स आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तब्बल 16 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे इंडोनेशियातील चार जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.
This afternoon, a major landslide and flash flood hit Dedalu Village in Lut Tawar District, Central Aceh Regency, Indonesia. pic.twitter.com/pqN83T8OHH — Weather Monitor (@WeatherMonitors) January 5, 2026
इंडोनेशियातील काही ठिकाणी अजूनही वीज आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. साऊथ ईस्ट भागातील संपर्क तुटला आहे. घटनेत प्रभावित झालेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. 16 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 22 लोक जखमी झाले आहेत. तर 682 नागरिक दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत.