'या' भारतीय हॉटेलमध्ये राहिले आहेत डोनाल्ड ट्रम्प; एका रात्रीचे भाडे 8 लाख, सुविधा पाहून व्हाल हैराण
डोनाल्ड ट्रम्प आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर प्रत्येक देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्रम्प यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले. ट्रम्प आणि भारत यांच्यातील संबंधांबद्दल बोलायचे झाले तर ही मैत्री कोणापासून लपलेली नाही. याआधी ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी पत्नीसह भारत दौरा केला होता.
यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था दिल्लीत स्थित ITC मौर्या हॉटेलच्या आलिशान चाणक्य सूटमध्ये करण्यात आली होती. या भेटीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे औपचारिक स्वागत केले होते. हा क्षण भारतीय-अमेरिकन संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण क्षण होता.
हॉटेलमधील सोयीसुविधा
ITC मौर्या हॉटेलमधील चाणक्य सूट भारतीय लक्झरी हॉटेल्समधील सर्वोत्तम हॉटेल आहे. हे हॉटेल 4,600 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला असून भारतीय कला आणि वस्तूंनी सजवण्यात आला आहे. सूटमध्ये आधुनिक आणि आलिशान सोयीसुविधा आहेत लिव्हिंग रूम, प्रायव्हेट डायनिंग रूम, मिनी स्पा, व्यायामशाळा, आणि खाजगी व्यवसाय अंगण यासारख्या सुविधांचा हॉटेलमध्ये समावेश आहे.
हे देखील वाचा- प्रवासादरम्यान गोंधळातही झोप का येते? जाणून घ्या यामागची कारणे
एका रात्रीचे भाडे 8 लाख
याशिवाय मोत्याने सजवलेले भव्य बाथरूम हॉटेलच्या उच्च दर्जाची ओळख करून देतो. हॉटेलच्या इनडोअर हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांनुसार आहे. हे दिल्लीसारख्या प्रदूषित शहरात दुर्मिळ मानले जाते. या सूटचे एका रात्रीचे भाडे सुमारे 8 लाख रुपये आहे. हे भाडे सर्वसाधारण भारतीय नागरिकांसाठी चकित करणारे आहे. भारतातील दलाई लामा, टोनी ब्लेअर, व्लादिमीर पुतिन, किंग अब्दुल्ला आणि ब्रुनेईचे सुलतान यांसारख्या अनेक जागतिक नेत्यांनीही येथे मुक्काम केला आहे.
कसे पोहचाल?
ITC मौर्या दिल्लीच्या मध्यभागी धौला कुआनजवळ स्थित आहे. यासाठी तुम्हाला दिल्ली मेट्रोचे धौला कुआन स्टेशन जवळचे आहे. याशिवाय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरूनही हॉटेलमध्ये सोयीने तुम्हाला पोहोचता येईल. हॉटेलने दिल्लीच्या व्यस्त वातावरणात एक आलिशान निवासस्थान उपलब्ध करून दिले आहे. हे हॉटेल त्यांचा ग्राहकांना एक शाही अनुभव देते. ट्रम्प यांचा हा दौरा भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक ठरला, तर ITC मौर्या हॉटेलने त्यांच्या आलिशान व्यवस्थेने या भेटीचा अनुभव अधिक खास केला.