Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: भारतातील चमत्कारी गणेश मंदिरं, रामायणापासून अनेक पौराणिक कथांमध्ये आहे उल्लेख

भारतात पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिण ते उत्तरेपर्यंत अनेक गणेश मंदिरं वसलेली आहेत. मात्र यातील काही निवडक अशी गणेश मंदिरं आहेत जी आपल्या रहस्यमयी आणि प्राचीन इतिहासामुळे देशभर प्रचलित आहेत. या गणेशोत्सवानिमित्त या चमत्कारी मंदिरांना एकदा भेट नक्की द्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2024 | 11:36 AM
Ganesh Chaturthi 2024: भारतातील चमत्कारी गणेश मंदिरं, रामायणापासून अनेक पौराणिक कथांमध्ये आहे उल्लेख

Ganesh Chaturthi 2024: भारतातील चमत्कारी गणेश मंदिरं, रामायणापासून अनेक पौराणिक कथांमध्ये आहे उल्लेख

Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या जोशात आणि थाटामाटात साजरा केला जात आहे. घरोघरी गणेशाचे आगमन झाले असून सध्या सर्वत्र एक पवित्र वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवसांत अनेकजण बाप्पाची मनोभावनेने पूजा करत त्याला प्रसाद अर्पण करतात आणि त्याच्या चरणी लीन होतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी गणेशोत्सव एक सण आहे. या उत्सवानिमित्त अनेक भाविक देशातील प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट देत असतात. परंतु फार कमी लोकांना ठाऊक आहे की देशात असेही काही रहस्यमयी आणि चमत्कारी मंदिरं आहेत ज्यांचा उल्लेख अनेक पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे. या मंदिरांविषयीच्या भाविकांच्या श्रद्धा प्रचलित आहेत. चला तर मग आज याविषयीच सविस्तर जाणून घेऊयात.

त्रिनेत्र गणेश मंदिर

देशातील प्राचीन गणेश मंदिरांचा उल्लेख करताच अनेक लोक प्रथम त्रिनेत्र गणेश मंदिराचे नाव घेताना दिसतात. हे प्रसिद्ध मंदिर राजस्थानच्या सवाई माधोपूरपासून 13 किलोमीटर अंतरावर रणथंबोर किल्ल्याच्या आत आहे. या मंदिराविषयी अशी धारणा आहे की, हे देशातील असे एकमेव मंदिर जिथे भगवान गणेश आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतात. या पवित्र मंदिराचा उल्लेख रामायण काळात आणि द्वापार कालखंडातही असल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार, प्रभू रामाने लंकेला जाण्यापूर्वी या मंदिरातील गणेशाचा अभिषेक केला होता.

हेदेखील वाचा – जगातील या नद्यांना मिळाले आहे एक वेगळे वरदान, येथून बाहेर पडते सोने, भारतातील या नदीचा समावेश

श्री विनायक मंदिर

प्राचीन मंदिरांमध्ये कर्नाटकातील श्री विनायक मंदिराचा मुख्यत्वे समावेश होतो. हे मंदिर कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापुरा येथे स्थित आहे. हे मंदिर संपूर्णपणे श्री गणेशाला समर्पित असून हे देशातील एकमेव जलाधिवास गणपती मंदिर असल्याचे म्हटले जाते. भाविकांच्या मान्यतेनुसार, खडकातून गणेशाची तीन फुटांची मूर्ती स्वतःहून बाहेर आली. जे खऱ्या मानाने इथे येऊन गणेशाची पूजा करतात त्यांची मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची मान्यता आहे.

चिंतामण मंदिर

मध्य प्रदेशातील उज्जैन हे धार्मिक स्थळांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथील चिंतामण मंदिर एक रहस्यमयी मंदिर मानले जाते. या मंदिराविषयीची खास आणि अनोखी गोष्ट म्हणजे या मंदिराविषयी बोलले जाते की, हे असे एकमेव मंदिर आहे ज्याच्या उभारणीसाठी स्वतः भगवान गणेश पृथ्वीवर अवतरले होते. या मंदिराबाबत आणखी एक समज अशी आहे की प्रभू रामाने आपल्या वनवासात या मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरातही भाविकांची मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024 : भारतातील प्राचीन रहस्यमयी गणेश मंदिरं, फार कमी लोकांना माहिती आहेत, एकदा नक्की भेट द्या

कानिपकम गणेश मंदिर

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात कानिपकम गणेश मंदिर वसलेले आहे. हे प्रसिद्ध आणि रहस्यमयी मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराविषयी असे बोलले जाते की, हे असे एकमेव मंदिर आहे जिथली मूर्ती स्वतःच वाढत राहते. या मंदिरातून एक नदीदेखील वाहते. कनिपकम गणेश मंदिरात जाण्यापूर्वी जो कोणी या नदीत स्नान करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

Web Title: Ganesh chaturthi 2024 mysterious ganapati temples in india mentioned in ramayana and mythological stories as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 11:36 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Festival

संबंधित बातम्या

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
1

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा
2

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! खास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘या’ ऑटो कंपनीकडून कारच्या किमतीत 2 लाख रुपयांची कपात
3

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! खास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘या’ ऑटो कंपनीकडून कारच्या किमतीत 2 लाख रुपयांची कपात

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा
4

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.