गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षी 7 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. बापाच्या आगमनासाठी संपूर्ण देश आता आतुर झाला असून त्याच्या स्वागताच्या तयारींना आता सुरुवात झाली आहे. सर्वत्र एक प्रसन्न वातावरण आणि बाप्पाच्या नावाचा जयघोष गाजत आहे. या सणानिमित्त अनेक लोक देशातील काही प्रसिद्ध आणि प्राचीन गणेश मंदिरांना भेट देत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात बाप्पाची काही प्राचीन आणि रहस्यमयी मंदिर आहेत जी फार कमी लोकांना माहिती आहेत. या मंदिरांचा महिना देशभर प्रसिद्ध आहे.
देशात गणेशाची अनेक मंदिरं आहेत मात्र ही मंदिरं खूप जुनी आणि प्रसिद्ध आहेत. या मंदिरांना भेट देताच आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. आज आम्ही तुम्हाला गणेशाच्या काही खास मंदिराविषयी सांगत आहोत. या मंदिरांना तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी.
हेदेखील वाचा – Travel: जिथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घावदेखील निरर्थक ठरला असे भारतातील राधाकृष्णाचे चमत्कारी मंदिर, 300 वर्षे जुना इतिहास
श्री गणेशाचे हे मंदिर फार जुने आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर केरळमध्ये स्थित आहे. केरळमधील मधुरवाहिनी नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराची बांधणी 10 व्या शतकात करण्यात आली होती. या मंदिराला केरळचे महासिध्दीविनायक मंदिर असेदेखील म्हटले जाते. इथे नेहमीच भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
उज्जैनमध्ये असलेल्या शंकराच्या मंदिराविषयी सर्वांना माहिती आहे. परंतु या महाकाल नगरीत भगवान श्री गणेशाचे चिंतामणी गणेश मंदिर देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. हे मंदिर पुणे-सोलापूर महामार्गावरून 22 किमी अंतरावर आहे. या मंदिरात श्री गणेशाच्या तीन मुर्त्या आहेत. गर्भगृहातील पहिल्या मूर्तीला चिंतामण, दुसऱ्या मूर्तीला इच्छामन आणि तिसऱ्या मूर्तीला सिद्धी विनायक या नावाने संबोधले जाते.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या
रणथंबोर गणेश मंदिर हे राजस्थानमधील रणथंबोर येथे वसले आहे. हे मंदिरे हजार वर्षे जुने आहे. हे मंदिर रणथंबोर किल्ल्याच्या सर्वोच्च भागात आहे. मंदिराची खासियत म्हणजे या मंदिरात तीन डोळ्यांच्या गणेशाची मूर्ती बसवण्यात आली आहे. अशात तुम्ही राजस्थानला जायचा विचार करत असाल तर या मंदिराला भेट देण्याचा विचार तुम्ही करू शकता.