Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्सूनमधल्या गोव्याचं आगळं वेगळं सौंदर्य; यावर्षी नक्की करा प्लॅन

पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर गोवा हा उत्तम पर्याय असू शकतो. गोव्याचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये आणखी खुलते.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 20, 2024 | 01:43 PM
पावसाळ्यामधील सर्वोत्तम गोवा ट्रीप

पावसाळ्यामधील सर्वोत्तम गोवा ट्रीप

Follow Us
Close
Follow Us:

गोवा : गोवा म्हटलं की समोर येतात समुद्रकिनारे, क्लब, नाईट पार्टी, क्रूझ. आजच्या तरुण वर्गाला सर्वात जास्त भुरळ आहे ती तिथल्या पार्टी कल्चरची. साधारणतः उन्हाळा आणि हिवाळा ऋतूत लोक गोव्याला फिरायला जातात. पण, गोवा पावसाळ्यात सुद्धा स्वर्गाहून सुंदर दिसतो. हे क्वचितच लोकांना माहित आहे. मान्सूनमध्ये गोवा हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. गोव्यात समुद्रकिनाऱ्या सोबतच चर्च, मंदिरं, ऐतिहासिक वास्तू, तसेच तेथील खाद्यसंस्कृती या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येतो. देश विदेशातील अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.

पावसाळ्यातील समुद्रकिनारे

गोव्यामध्ये पर्यटकांना प्रमुख आकर्षण हे समुद्रकिनाऱ्यांचे आहे. समुद्र खवळलेला असल्याने पावसाळ्यात बऱ्याचवेळा समुद्रावर जायला परवानगी नसते. पण जेव्हा वातावरण ठीक असेल आणि तुम्हाला उसळत्या आणि खळखळत्या लाटांचा आवाज आवडत असेल तर तुम्ही पावसाळ्यात सुद्धा समुद्रकिनारचे नयनरम्य दृश्य पाहू शकता.

ऑफ सीझनचा घेता येईल फायदा

गोव्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र ही संख्या पावसाळ्यामध्ये कमी होती. ही वेळ गोवा फिरण्यासाठी आणि तिथले नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. पावसाळ्यात गोव्याला जायचा फायदा असा कि ऑफ सीझन असल्यामुळे पर्यटक कमी असतात. त्यामुळे हॉटेल्स बुकिंगचे रेट पण कमी असतात. तुम्हाला बजेट फ्रेंडली ट्रिप हवी असेल तर नक्की गोव्याला भेट देऊ शकता. पावसाळ्यातील गोवा ट्रीप तुमच्या खिशाला कात्री लावणार नाही हे नक्की.

गोव्याची संस्कृती

गोव्याला समृद्ध असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. गोव्यात अनेक सण आणि उत्सव आनंदात साजरे केले जातात. पर्यटकांना त्यांचे खास आकर्षण आहे. पावसाळ्यातसुद्धा गोवन संगीत,नृत्य आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. गोव्यामधील छोटी छोटी सुंदर गावं सुद्धा पावसाळ्यात पाहण्यासारखी आहेत. पावसाळ्यामध्ये गोव्याचं सौंदर्य आणखी बहरते. त्यामुळे हे नेत्रदीपक सुख तुम्ही पावसाळ्यातील ट्रीपमध्ये अनुभवू शकता. हा तुमचा अनुभव इतरांच्या गोवा ट्रीपपेक्षा अधिक वेगळा असेल.

दूधसागर धबधबा

देशातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या धबाधब्यांमध्ये दूधसागर धबधब्याचे नाव आवर्जुन घेतले. पावसाळ्यामध्ये गोव्याला गेलात तर तुमच्या पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये दूधसागरचा समावेश आवश्य करावा.  गोव्याला पावसाळ्यात जाताना लागतो सर्वात सुंदर असा दूधसागर धबधबा. तसेच हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. दूधसागर धबधबा हा ३९० मीटर उंचीवरून खाली पडतो. या धबधब्याचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर इथे ट्रेकिंग करूनही जाता येतं. निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी तर हा धबधबा म्हणजे ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशा पद्धतीने गौव्याच्या ट्रीप प्लॅन केली तर नक्कीच तुमच्या अनुभवाच्या शिदोरीमध्ये अविस्मरणीय अशा आठवणींची गर्दी होईल.

Web Title: Goa monsoon trip destination dudhsagar falls and goa traditional festivals nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 01:43 PM

Topics:  

  • Goa

संबंधित बातम्या

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा
1

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा

Navi Mumbai : पळस्पे येथे पाटपूजन करून महामार्ग आंदोलनाची सुरुवात
2

Navi Mumbai : पळस्पे येथे पाटपूजन करून महामार्ग आंदोलनाची सुरुवात

स्वस्तात पूर्ण होईल गोव्याची सफर; या सीजनमध्ये करा ट्रिप प्लॅनिंग; किमती होतात अर्ध्याहून कमी
3

स्वस्तात पूर्ण होईल गोव्याची सफर; या सीजनमध्ये करा ट्रिप प्लॅनिंग; किमती होतात अर्ध्याहून कमी

Mumbai To Goa : मुंबईहून गोवा अवघ्या १२ तासांत पोहचा.., भारतात पहिल्यांदाच सुरु होणार फेरी सेवा
4

Mumbai To Goa : मुंबईहून गोवा अवघ्या १२ तासांत पोहचा.., भारतात पहिल्यांदाच सुरु होणार फेरी सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.