ऑक्टोबर-मार्च दरम्यान फिरण्याचा विचार करताय? IRCTC कडून फ्लाइट तिकिटांवर मिळत आहे भरपूर सूट!
प्रवास आपल्या जीवनात फार महत्त्वाचा असतो. कामाच्या व्यस्त लाइफस्टाइलमधून थोडा वेळ काढून प्रवास करणे फार गरजेचे असते. यामुळे अनेक वेगवगेळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो. आता तुम्हीही ऑक्टोबर-मार्च दरम्यान कुठे फिरायला जायच्या विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार केला आहे मात्र ट्रेनचे तिकीट मिळत नसेल तर तुम्ही फ्लाइटने जाण्याचा विचार करत असाल. आता फ्लाइट म्हटलं अनेकांना घाम फुटतो लगेच बजेटची चिंता वाटू लागते मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की आता तुम्ही फार कमी रुपयांत फ्लाइटचे बुकिंग करू शकता म्हणजेच यासाठी तुम्हाला अधिक पैसे घालवण्याची गरज नाही.
भारतीय रेल्वेच्या IRCTC (Indian Railway) तर्फे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IRCTC आपली 25 वर्षे साजरी करत आहे. जर तुम्हाला ट्रेनचे तिकीट मिळत नसेल, तर फ्लाइटने प्रवास करण्याचा प्लॅन करा. कारण भारतीय रेल्वे आपल्या वर्धापन दिनानिमित्त फ्लाइट तिकिटांवर चांगल्या ऑफर्स देत आहे. 3 दिवसांसाठी प्रवाशांना फ्लाइट तिकीट बुकिंगची सुविधा मिळणार आहे. तुम्ही या संधीचा कसा फायदा घेऊ शकता आणि यासाठी नक्की काय करावे लागेल ते आजच्या या लेखातुन्ज जाणून घ्या.
हेदेखील वाचा – या देशात फिरणे आहे पूर्णपणे मोफत, टुरिस्ट एक रुपयाही न करता करू शकतात ट्रॅव्हल
हेदेखील वाचा – जिथे देवीच्या चमत्कारासमोर औरंगजेबालाही फुटला होता घाम, दुर्गा देवीचे अनोखे मंदिर, या नवरात्रीत नक्की भेट द्या