जीवनात शिक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच प्रवासालाही महत्त्व आहे, कारण याद्वारे आपल्याला अनेक गोष्टी जवळून जाणून घेण्याची संधी मिळते. जरी बहुतेक लोकांना प्रवासाची आवड असते, परंतु काहीवेळा बजेटमुळे त्यांना आपले प्लॅन्स पूर्ण करता येत नाहीत. मात्र आता एका देशात फिरण्याचे स्वप्न तुमचे प[पूर्ण होऊ शकते आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याचीही गरज भासणार नाही. आज आम्ही तुम्हाला युरोपमध्ये एका देशाविषयी सांगणार आहोत, जिथे नागरिकांना तसेच जगभरातील पर्यटकांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मोफत जाण्याची संधी मिळते. एवढेच नाही तर या देशाची गणना जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये केली जाते. चला तर मग जाणून घेऊया इथे प्रवास कसा मोफत आहे.
आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव लक्ज़मबर्ग (luxembourg) आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, या देशाची गणना युरोपमधील सर्वात महागड्या देशांमध्ये केली जाते, परंतु तरीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे पूर्णपणे विनामूल्य आहे. कारण संपूर्ण जगात हा पहिला देश आहे जिथे सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे मोफत ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये बस, ट्रेन आणि ट्राम या ट्रॉली कारचा समावेश आहे.
हेदेखील वाचा – जिथे देवीच्या चमत्कारासमोर औरंगजेबालाही फुटला होता घाम, दुर्गा देवीचे अनोखे मंदिर, या नवरात्रीत नक्की भेट द्या
तुम्ही भारतात किंवा परदेशात कुठेही प्रवास करता तेव्हा तुम्हाला वाहतुकीसाठी खूप पैसे मोजावे लागतात, पण लक्ज़मबर्ग हे इतर देशांपेक्षा वेगळे आहे. येथे उपलब्ध असलेली मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा देशातील नागरिकांनाच नाही तर येथे येणाऱ्या पर्यटकांनाही मोफत दिली जाते. म्हणजे जर तुम्ही या देशात फिरायला जात असाल तर तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय आणि एक रुपयाही खर्च न करता येथे प्रवास करू शकता.
हेदेखील वाचा – तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या केसांचा करोडोंमध्ये बिसनेस, सात पिढ्या बसून खातील एवढी जमते रक्कम
लक्जमबर्ग आपल्या इतिहासासाठी आणि आश्चर्यकारक किल्ल्यांसाठी जगभरात ओळखले जाते. या देशाचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येथे येत असतात. इथे तुम्ही ले चेमिन डे ला कॉर्निश, न्यूमुन्स्टर एबे, द बॉक एंड कैसमेट्स, द ग्रंड डिस्ट्रिक्ट ,लक्जमबर्ग नेशनल म्यूजियम आणि लक्जमबर्ग सिटी म्यूजियम खूप फेमस आहे. तसेच जगभरातून अनेक पर्यटक इथे लक्झेंबर्गच्या ग्रँड डचीच्या उत्तरेकडील भागात असलेला विआनडेन कॅसल पाहण्यासाठी येत येतात.