लवकरच नवरात्रीचा उत्सव सुरु होणार आहे. यंदा 3 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना होणार आहे. तसेच 12 ऑक्टोबर 2024 रोजी याची सांगता होणार आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे. नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीत देवीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात, अशी धारणा आहे. पूजे व्यतिरिक्त अनेक लोक या सणात देशातील प्रसिद्ध दुर्गा देवीच्या मंदिरांना भेट देत असतात. आज आम्ही तुम्हाला देशातील एका सुप्रसिद्ध दुर्गा देवीच्या मंदिराविषयी माहिती देत आहोत. या मंदिराची आख्यायिका वाचून तुम्ही थक्क व्हाल.
वैष्णो देवी, कामाख्या देवी, नैना देवी किंवा चामुंडा देवी मंदिरांबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. याचप्रमाणे देशात असेही एक मंदिर आहे जिथली आख्ययिका संपूर्ण पंचक्रोशीत सुसिद्ध आहे. आम्ही ज्या मंदिराबद्दल सांगत आहोत, ते मंदिर राजस्थानमध्ये जीन माता मंदिराच्या नावाने प्रचलित आहे, हे एक दुर्गा मंदिर आहे, ज्याला भाविक एक चमत्कारी मंदिर म्हणून समजतात. या मंदिराविषयी काही रंजक गोष्टी आहेत ज्या आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.
हेदेखील वाचा – तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या केसांचा करोडोंमध्ये बिसनेस, सात पिढ्या बसून खातील एवढी जमते रक्कम
जीन माता मंदिराचं इतिहास फार जुना आणि प्राचीन आहे. या मंदिराबाबत असे सांगितले जाते की, हे मंदिर सुमारे 1200 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. अनेकदा या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. या मंदिराविषयीची एक मान्यता अशी आहे की, हे मंदिर 9व्या शतकात बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या भिंतींवर 9व्या शतकापेक्षा जुने शिलालेख असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात एकूण आठ शिलालेख आहेत, जे मंदिराच्या सर्वात प्राचीन भागाचा पुरावा मानला जातात.
हेदेखील वाचा – या गावामुळे पुण्याच्या विमानतळाचे नाव बदलणार! संत तुकारामांच्या नावावर एयरपोर्टचे नवीन नाव…
पौराणिक मान्यतेनुसार, जीन मातेचा जन्म चौहान नावाच्या राजाच्या घरी झाला. जीन मातेच्या मोठ्या भावाचे नाव हर्ष असे होते. हर्ष हा दैवी अवतार असल्याचे मानले जाते. कथेनुसार, एके दिवशी भाऊ आणि बहिणीमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वाद निर्माण झाला आणि जीन माता रागावली, त्यावेळी ती राजस्थानच्या सीकरमध्ये तपश्चर्या करू लागली. भावाने बहिणीचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही देवी जीनचा राग शांत झाला नाही. नंतर हळूहळू या ठिकाणी पूजा होऊ लागली आणि ते पवित्र स्थान मानले जाऊ लागले.
जीन मंदिराला एक चमकतकरी मंदिर म्हणून ओळखले जाते. याबाबत एक प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे की, एके दिवशी औरंजेबाने हे मंदिर लुटण्यासाठी आणि पाडण्यासाठी आपले सैन्य येथे पाठवले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी हजारो सैन्य पाहून मातेला रक्षणासाठी आवाहन केले, तेव्हा मातेच्या चमत्कारामुळे मोठ्या मधमाश्या औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडल्या. मधमाश्यांच्या हल्ल्याने संपूर्ण सैन्याला गंभीर दुखापत झाली आणि यामुळे सर्व सैन्य तिथून पळन गेले. जेव्हा औरंगजेब फार आजरी पडू लागला तेव्हा त्याने देवीच्या मंदिरात जाऊन माफी मागितली. औरंगजेब बरा झाल्यानंतर त्याने मंदिरात अखंड दिवा लावल्याचेही सांगितले जाते.
नवरात्रीत या मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते. राजस्थनमध्ये वसलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम जयपूरला जावे लागेल. इथून हे मंदिर जवळ आहे. जयपूरपासून जीन माता मंदिराचे अंतर सुमारे 115 किमी आहे.