Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी! कमी बजेटमध्ये घ्या हिमाचलच्या निसर्गमय सौंदर्याचा अनुभव

निसर्गसौंदर्याचा अद्भुत करिष्मा हिमाचल प्रदेशात पाहायला मिळतो. भारतीय रेल्वे हिमाचलमधील दोन सर्वोत्तम ठिकाणे एक्सप्लोर करण्याची संधी घेऊन येत आहे. कमी बजेटमधील या टूर पॅकेजची वैशिष्ट्ये जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2024 | 12:02 PM
भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी! कमी बजेटमध्ये घ्या हिमाचलच्या निसर्गमय सौंदर्याचा अनुभव

भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी! कमी बजेटमध्ये घ्या हिमाचलच्या निसर्गमय सौंदर्याचा अनुभव

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील अनेक ठिकाण आहे नजीसर्गाने समृद्ध आहेत. या ठिकाणी जाऊन मनःशांती मिळते. हिमाचल प्रदेशदेखी यातीलच एक आहे. हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पहाडी राज्य आहे. हा एक बर्फाच्छादित प्रदेश आहे. इथले सौंदर्य स्वर्गाहून कमी नाही. अनेकांचं हिमाचलला जाण्याचं स्वप्न असत, तुम्हीही यातीलच असाल तर आता तुम्हाला भारतीय रेल्वेकडून एक सुवर्णसंधी प्राप्त होत आहे. जोडीदाराची साथ आणि निसर्गमय वातावरण याहून अधिक काय हवं… जाणून घ्या या पॅकेजबद्दल सविस्तर.

कुटुंबासोबत ट्रिपसाठी हे पॅकेज उत्तम

भारतीय रेल्वेच्या IRCTC ने भारतीय प्रवाशांसाठी फिरण्यासाठीची एक उत्तम संधी आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही हिमाचल प्रदेशच्या दोन सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. हे दोन ठिकाण आहेत, डलहौसी आणि मॅक्लॉडगंज. विशेष म्हणजे अगदी कमी बजेटमध्ये तुम्हाला या ठिकाणांना भेट देता येणार आहे. ही ट्रिप एकूण 8 दिवसांची असेल यात तुम्हाला राहण्यापासून ते जेवणापर्यंत अनेक सोई-सुविधा उपलब्ध होतील. IRCTC ने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर टूर पॅकेजची माहिती शेअर केली आहे. जर तुम्ही आपल्या कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करण्याचा विचार करत असाल तर हा टूर पॅकेज तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

  • पॅकेजचे नाव- एव्हरग्रीन हिमाचल-कन्फर्म तिकीट
  • पॅकेज कालावधी- 7 रात्री आणि 8 दिवस
  • प्रवास – ट्रेन
  • कव्हर केलेली ठिकाणं- डलहौसी, मॅक्लॉडगंज, अंबाला

टूर पॅकेजमध्ये अनेक सुविधा मिळतील

  • तुम्हाला या पॅकेजमध्ये, ट्रेनची 3AC वर्गाची तिकिटे उपलब्ध असतील
  • तसेच राहण्यासाठी डिलक्स हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल
  • तुम्हाला या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल

हेदेखील वाचा – श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकाच राज्यातील या दोन ज्योतिर्लिंगांना नक्की भेट द्या! 2 दिवसांतच यात्रा पूर्ण होईल

टूर पॅकेजची किंमत

  • या ट्रीपमध्ये जर तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 56,850 रुपये भरावे लागतील
  • जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 33,150 रुपये मोजावे लागतील
  • तीन लोकांना प्रति व्यक्ती 26,350 रुपये शुल्क भरावे लागेल
  • तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी वेगळे पैसे अकरावे लागतील
  • बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 12,850 रुपये द्यावे लागतील
  • बेडशिवाय तुम्हाला 5,600 रुपये द्यावे लागतील

टूर पॅकेजचे बुकिंग कसे करावे?

या टूर पॅकेजचे बुकिंग करण्यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला पॅकेज संबंधित सविस्तर माहिती उपलब्ध होईल.

 

 

Web Title: Indian railway launched budget free himachal pradesh tour package

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • Himachal Pradesh

संबंधित बातम्या

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video
1

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
2

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides
3

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

भयानक! हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यूचे तांडव; ५७ दिवसांमध्ये तब्बल…; सरकारच्या आकड्यांनी उडेल थरकाप
4

भयानक! हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यूचे तांडव; ५७ दिवसांमध्ये तब्बल…; सरकारच्या आकड्यांनी उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.