लवकरच श्रावण महिना सुरु होणार आहे. हा महिना सुरु होताच भक्तजन भगवान शंकराच्या दर्शनासाठी दूरदूरचा प्रवास सुरु करतात. श्रावणात सोमवारांना फार महत्त्व असते. त्यांना श्रावणी सोमवार असे संबोधले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगत आहोत, जिथे तुम्ही एक नाही तर दोन ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण करू शकता. देशातील एका राज्यात दोन ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण करण्याचे भाग्य लाभत आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
आज आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशातील दोन पवित्र ज्योतिर्लिंगांविषयी सांगत आहोत. तुम्ही दिल्ली किंवा इतर कोणत्याही राज्यात राहत असाल तर उज्जैनला जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ट्रेनचे तिकीट बुक करावे लागेल. नंतर उज्जैन रेल्वेस्थानकावर उतरताच तुम्हाला अनेक टॅक्सी आणि ऑटो मिळतील, ज्या तुम्हाला सिद्ध मंदिरात घेऊन जातील.
तुम्ही येथे शांततेत पूर्ण दिवस महाकालेश्वरचे दर्शन केल्यानंतर महाकाल लोक या ठिकाणी भेट देऊ शकता. महाकालेश्वर मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला राहण्यासाठी अनेक हॉटेल्स मिळतील. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याच दिवशी ओंकारेश्वर मंदिरालाही भेट देऊ शकता. फक्त असे करताना तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागू शकतो.
दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर जाण्याचा प्लॅन करू शकता. यासाठी सकाळी 5 वाजता लवकर उठून तुमच्या हॉटेल जवळील टूर्स अँड ट्रॅव्हल्सला भेट देऊन ओंकारेश्वरला जाण्यासाठी कॅब करू शकता. ही कॅब तुम्हाला थेट ओंकारेश्वर मंदिरात घेऊन जाईल आणि तेथून तुम्हाला उज्जैनला परत देखील आणेल. दुस-या दिवशी संध्याकाळपर्यंत उज्जैनहून तुमच्या घरी जाण्यासाठी तुम्ही तिकीट मिळवू शकता.
जर तुम्ही तीन ते चार दिवस राहण्याचे नियोजन केले असेल, तर तुम्ही उज्जैनमधील भैरवनाथ मंदिर, हरसिद्धी माता मंदिर, खजराना गणेश यासारख्या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.
ओंकारेश्वरमध्ये तुम्ही नर्मदा नदीत स्नान करण्याचा आनंद घेऊ शकता. त्यांनतर तुम्ही नगर घाट, गोविंदा भागवतपाडा गुहा, केदारेश्वर मंदिर या ठिकाणांना भेट देऊ शकता. मात्र श्रावणाच्या पहिल्या आठवड्यात या जागी फार गर्दी असेल त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.