Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर सुरु झाला प्रगती मैदानाचा ट्रेड फेयर! कुटुंबासोबत घेता येईल अविश्वसनीय अनुभव, एकाच जागी मिळेल सर्वकाही

दिल्लीतील प्रगती मैदानावर इंटरनेशनल ट्रेड फेअर सुरू झाला आहे. जर तुम्ही येथे जाण्याचा विचार करत असाल, इथे जाण्याची वेळ, तिकीटाची किंमत आणि ऑनलाइन-ऑफलाइन तिकीट कसे बुक करावे अशी सर्व माहिती जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 15, 2024 | 09:13 AM
अखेर सुरु झाला प्रगती मैदानाचा ट्रेड फेयर! कुटुंबासोबत घेता येईल अविश्वसनीय अनुभव, एकाच जागी मिळेल सर्वकाही

अखेर सुरु झाला प्रगती मैदानाचा ट्रेड फेयर! कुटुंबासोबत घेता येईल अविश्वसनीय अनुभव, एकाच जागी मिळेल सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीतील प्रगती मैदानावर इंटरनेशनल ट्रेड फेअर सुरू झाला आहे. या वर्षी 43व्या इंटरनेशनल ट्रेड फेअरचे आयोजन केले जात आहे, जिथे तुम्ही 14 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान या मेळ्याला भेट देऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो, देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे उत्पादने विकण्यासाठी येतात. चांगली गोष्ट अशी आहे की IITF हा छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांसाठी देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेंड इव्हेंट आहे.

येथे येणारे अभ्यागत नवीन प्रोडक्ट्स, इनोवेशन, क्राफ्ट यांसारखी अनेक गोष्टी पाहू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी ट्रेड फेअरची थीम ‘व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल’ अशी ठेवण्यात आली आहे. नावाप्रमाणेच, व्यापार मेळा स्थानिक व्यवसायाला चालना देण्यावर आणि जागतिक व्यापाराचा विस्तार करण्यावर भर देतो. जर तुम्हाला इथे जायचे असेल तर प्रथम ट्रेड फेअरशी संबंधित काही महत्वाची माहिती जाणून घ्या.

ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

इथे एवढे लोक येण्याची आहे आशा

येथे दररोज सुमारे 60,000 लोक येण्याची अपेक्षा आहे. आठवड्याचे शेवटचे दिवस आणि सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची संख्या 1.5 लाखांपर्यंत पोहोचू शकते. यावेळी, 11 देश, 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, 49 मंत्रालये, विभाग आणि PSU तसेच 500 खाजगी क्षेत्र/कंपन्या व्यापार मेळ्यात सहभागी होतील. तुम्ही मेट्रो तिकीट काउंटरवरून ट्रेड फेअरची तिकिटे देखील खरेदी करू शकता, ही तिकिटे 55 स्थानकांवर उपलब्ध आहेत.

कधीपासून सुरु होईल एंट्री

मेळाव्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7.30 अशी आहे. तुम्हाला सांगतो की, 1,07,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रात बांधलेल्या भारत मंडपम कॉम्प्लेक्सच्या नवीन हॉलमध्ये इंटरनेशनल ट्रेड फेअर आयोजित केला जात आहे. जर तुम्ही इथे जाण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की 14-18 नोव्हेंबर दरम्यान ट्रेड फेअरमध्ये व्यवसायाशी संबंधित गोष्टी असतील. तर सामान्य अभ्यागतांसाठी 19 नोव्हेंबरपासून प्रवेश सुरू होईल आणि 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू राहील.

त्याचबरोबर व्यापार मेळ्यातील गेट क्रमांक 5-A, 5-B, 7, 8 आणि 9 चे प्रवेश बंद राहणार आहे. पर्यटक गेट क्रमांक 1, 4, 6 आणि 10 मधून प्रवेश घेऊ शकतात, तर प्रदर्शक गेट क्रमांक 1, 4, 5-B आणि 10 मधून प्रवेश घेऊ शकतात. मीडिया कर्मचाऱ्यांना 5-B मधून प्रवेश मिळेल. दुसरीकडे, दररोज संध्याकाळी 5.30 नंतर विजिटर्सना एंट्री दिली जाणार नाही.

ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तिकीटाची किंमत काय असेल?

कार्यक्रमासाठी तिकीट दर आठवड्याच्या दिवसानुसार बदलू शकतात. 14 ते 18 नोव्हेंबर या आठवड्याच्या दिवसांसाठी, सामान्य प्रवेश तिकिटांची किंमत 150 रुपये आहे, तर लहान मुलांची तिकिटे 60 रुपये आहेत. 19 नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांसाठी तिकीट दर 80 रुपये, तर लहान मुलांसाठी तिकीट 40 रुपये असेल. तर बिजनेस विजिटर्ससाठी तिकीटाची किंमत 500 रुपये असेल.

तिकीट ऑनलाईन की ऑफलाईन कसे बुक करावे?

ऑनलाइन तिकिटे:

ॲप्सद्वारे:

त्वरित तिकिटे मिळविण्यासाठी, तुमच्या मोबाइलवर “मोमेंटम 2.0 दिल्ली सारथी” किंवा “भारत मंडपम” ॲप डाउनलोड करा. तुम्ही या ॲप्सवरून थेट तिकीट खरेदी करू शकता.

वेबसाइट:

तुम्ही अधिकृत ITPO वेबसाइट (www.indiatradefair.com) किंवा DMRC वेबसाइट (www.itpo.autope.in) वर जाऊन तिकीट बुक करू शकता.

ऑफलाइन तिकिटे:

तुम्हाला ऑनलाइनचा त्रास नको असेल तर हरकत नाही! दिल्ली मेट्रोच्या 55 ​​स्थानकांवरही तिकिटे उपलब्ध असतील. शहीद स्थळ नवीन बस स्टँड, शिव विहार, समयपूर बदली आणि इंद्रलोक यासारख्या मोठ्या स्थानकांवर जाऊन तुम्ही थेट तिकीट खरेदी करू शकता.

Web Title: International trade fair 2024 begins from 14th nov know ticket price how to book and traffic advisory details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 09:12 AM

Topics:  

  • delhi

संबंधित बातम्या

Nizamuddin Dargah Roof Collapse :  निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू
1

Nizamuddin Dargah Roof Collapse : निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
2

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
3

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Huma Qureshi च्या भावाची हत्या कशी झाली? आरोपी हल्ला करत असतानाचा CCTV फुटेज समोर
4

Huma Qureshi च्या भावाची हत्या कशी झाली? आरोपी हल्ला करत असतानाचा CCTV फुटेज समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.