भारत हा विविधतेसाठी जगभरात ओळखला जातो. इथे तुम्हाला प्रत्येक ऋतूत काहीतरी खास पाहायला मिळेल. हिवाळ्याच्या हंगामात, जेव्हा संपूर्ण देश थरथर कापत असतो, तेव्हा भारतातील काही भाग चेरी ब्लॉसमच्या सुंदर दृश्यांनी बहरलेली असतात. होय, तुम्ही भारतातही चेरी ब्लॉसम्सचा आनंद घेऊ शकता. सहसा चेरी ब्लॉसमचे नाव ऐकले की आपल्या मनात फक्त जपान आणि कोरिया हे देश येतात, मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतातही असे काही ठिकाण आहेत जिथे चेरी ब्लॉसम पाहण्याचा आनंद लुटता येतो. चेरीच्या फुलांना जपानी भाषेत ‘साकुरा’ असे म्हटले जाते, म्हणूनच भारतात फुलणाऱ्या चेरी ब्लॉसम्सला ‘इंडियन साकुरा’ असे म्हटले जाते.
चेरी ब्लॉसम काय असते?
चेरी ब्लॉसम ही प्रुनस नावाच्या झाडांवर आढळणारी फुले आहेत. या फुलांचा वापर बहुतांश सजावटीसाठी केला जातो. ही फुले अतिशय सुंदर असून त्यांचा रंग गुलाबी ते पांढरा असतो. जेव्हा ही झाडे फुलतात तेव्हा संपूर्ण परिसर गुलाबी रंगाने व्यापलेला असतो. हे संपूर्ण दृश्य डोळ्यांना सुखावणारे असते. ही फुले त्या परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. आपल्या प्रियजनांसोबत या ठिकाणी एक चांगला वेळ घालवता येऊ शकतो.
हेदेखील वाचा – फक्त काश्मीरच नाही तर भारतातील ही ठिकाणही स्वर्गाहून कमी नाहीत, दृश्य पाहताच प्रेमात पडाल
भारतात चेरी ब्लॉसम कुठे पाहता येईल?
आता तुम्हाला चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी परदेशात कुठेही जाण्याची गरज नाही. भारतातही काही ठिकाणी तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. भारतात चेरी ब्लॉसम पाहण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या काळात, ही झाडे मोठ्या प्रमाणात बहरतात आणि संपूर्ण परिसर गुलाबी रंगाने व्यापलेला असतो.
शिलाँग, मेघालय
शिलाँगला भारताचे स्कॉटलंड म्हटले जाते. येथील वातावरण वर्षभर आल्हाददायक असते. हिवाळ्यात येथे चेरीचे फूल फुलतात आणि संपूर्ण शहर गुलाबी रंगाने व्यापलेले असते. शिलाँगमध्येही चेरी ब्लॉसम्स फेस्टिव्हल साजरा केला जातो. या उत्सवाला इंडिया इंटरनॅशनल चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल म्हणतात. हा उत्सव पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येथे येत असतात.
नागालँड
नागालँडमध्येही चेरी ब्लॉसम्स पाहायला मिळतात. ही झाडे इथल्या जंगलात भरपूर फुलतात. नोव्हेंबर महिन्यात ही फुले येतात. येथे अनेक ठिकाणी भेट देऊन तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही चेरी ब्लॉसम तसेच नागा संस्कृती अगदी जवळून पाहू शकता. त्यानंतर काही दिवसांनी येथे हॉर्नबिल फेस्टिव्हलही साजरा केला जातो.
हेदेखील वाचा – विचित्र परंपरा: मृतदेह खणून बाहेर काढतात, मग नवीन कपडे घालून पाजतात सिगारेट, कारण काय?
उत्तर सिक्कीम
सिक्कीमच्या सौंदर्याचे शब्दात वर्णन करणे खूप कठीण आहे. यासोबतच चेरी ब्लॉसम्सचा सीझन याचे सौंदर्य आणखीनच बहारदार बनतो. येथे लाचेंग आणि लाचुंगमध्ये तुम्ही चेरी ब्लॉसम्सचा आनंद घेऊ शकता. इथेही चेरीचे फूल फक्त नोव्हेंबर महिन्यातच फुलते.