Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Diwali Firecrackers Sale : मग प्रदुषण तर होणारचं ना! दिल्लीकरांनी एका दिवसात फोडले 300 कोटींचे फटाके

Delhi Diwali Firecrackers Sale : दिल्लीत दिवाळीत 300 कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री झाल्याचा सीटीआयचा अंदाज. गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्के वाढ; ग्रीन फटाक्यांचा पुरवठा आणि प्रमाणित उत्पादनांबाबत संभ्रम.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 09, 2026 | 08:42 PM
Delhi Diwali Firecrackers Sale : मग प्रदुषण तर होणारचं ना! दिल्लीकरांनी एका दिवसात फोडले 300 कोटींचे फटाके

Delhi Diwali Firecrackers Sale : मग प्रदुषण तर होणारचं ना! दिल्लीकरांनी एका दिवसात फोडले 300 कोटींचे फटाके

Follow Us
Follow Us:
  • फटाक्यांसाठी थेट, गुरुग्राम, नोएडापर्यंत धाव
  • ग्रीन फटाके ओळखण्याबाबतही संभ्रम
  • मागणी वाढली; व्यापाऱ्यांकडील साठा संपला
 

यंदाच्या दिवाळीत दिल्लीकरांनी तब्बल 300 कोटी रुपयांचे फटाके खरेदी केल्याचा (Delhi Diwali Firecrackers Sale) दावा चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (CTI) व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या विक्रीत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, ग्रीन फटाक्यांची वाढती मागणी, उशिरा मिळालेली परवानगी आणि अपुरा साठा यामुळे विक्री व्यवस्थेचा गोंधळ उडाल्याचे देखील सीटीआयने वक्तव्यात स्पष्ट केले आहे. दिल्लीतील हवामानाचा खालावलेला दर्जा पाहता दिल्लीकरांनी फटाक्यांकडे पाठ फिरवणे गरजेचे होते, मात्र त्यांनी तसं न करता 300 कोटींचे फटाके जाळत या प्रदुषण वाढवण्यास चांगलाच हातभार लावला आहे.

सीटीआयचे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या एक दिवस आधीच बहुतांश व्यापाऱ्यांकडील फटाक्यांचा साठा संपला होता. त्यामुळे फटाके खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहकांना गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद आणि सोनीपतपर्यंत जावे लागले. दिल्लीतील मागणीच्या तुलनेत फटाक्यांचा पुरवठा कमी पडल्याचे यातून स्पष्ट झाले.

ग्रीन फटाक्यांच्या नावाखाली संभ्रम

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये केवळ सीएसआयआर-नीरी प्रमाणित आणि क्यूआर कोड असलेल्या ग्रीन फटाक्यांच्या विक्रीला परवानगी दिली होती. त्यामुळे परवानाधारक दुकानांमधील विक्री ग्रीन फटाक्यांच्या नावाने झाली. मात्र, एकूण 300 कोटी रुपयांच्या विक्रीत प्रत्यक्ष प्रमाणित ग्रीन फटाक्यांचा वाटा किती आणि पारंपरिक फटाक्यांचा वाटा किती, याची अधिकृत लेखापरीक्षित माहिती उपलब्ध नसल्याचे सीटीआयने स्पष्ट केले.

प्रत्यक्ष बाजारात ‘ग्रीन’, ‘इको-फ्रेंडली’ आणि ‘प्रदूषणमुक्त’ असे उल्लेख असलेली पाकिटेही आढळली. मात्र, त्यांची प्रमाणित असल्याची खात्री ग्राहकांना करता येत नव्हती. दिल्लीमध्ये पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनेची (PESO) चाचणी सुविधा नसल्यामुळे फटाक्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे कठीण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Earthquake : एकाच दिवशी तीन ठिकाणी भूकंपाचे धक्के; तिबेट, सोलोमन द्वीप हादरले, महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा समावेश

मागणी वाढली; व्यापाऱ्यांकडील साठा संपला

यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर ग्राहकांमध्ये फटाके खरेदी करण्याचा उत्साह दिसून आला. अनेक ग्राहकांनी विशेषतः क्यूआर कोड असलेल्या ग्रीन फटाक्यांची मागणी केली. मात्र, व्यापाऱ्यांनी आपण रसायनतज्ज्ञ नसून नीरीकडे नोंदणीकृत ब्रँडच्या फटाक्यांची खरेदी करतो आणि पाकिटावरील क्यूआर कोड तपासतो, असे सांगितले. ग्रीन आणि पारंपरिक फटाक्यांमधील फरक सामान्य ग्राहकांना समजणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सीटीआयच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके फोडणाऱ्या कुटुंबांपैकी जवळपास निम्म्या कुटुंबांनी ग्रीन आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या फटाक्यांचा वापर केला. त्यामुळे प्रत्यक्षात किती प्रमाणात प्रमाणित ग्रीन फटाक्यांची विक्री झाली, हा प्रश्न कायम आहे.

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

पुढील वर्षी शंभर टक्के ग्रीन विक्रीचे लक्ष्य

उशिरा मिळालेली परवानगी, परवाना प्रक्रियेतील विलंब, क्यूआर कोड पडताळणीची अपुरी व्यवस्था आणि पुरेशा साठ्याचा अभाव यामुळे यंदाची विक्री व्यवस्था विस्कळीत झाल्याचा निष्कर्ष सीटीआयने काढला आहे. पुढील वर्षी वेळेत परवानगी आणि परवाने देणे, क्यूआर कोड पडताळणीची स्पष्ट व्यवस्था उभारणे तसेच पुरेसा साठा उपलब्ध करणे आवश्यक आहे. या उपाययोजना केल्यास पुढील वर्षी शंभर टक्के प्रमाणित ग्रीन फटाक्यांची विक्री शक्य असल्याचा दावा सीटीआयने केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यंदा दिल्लीत दिवाळीत किती रुपयांच्या फटाक्यांची विक्री झाली?

    Ans: चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीच्या (सीटीआय) अंदाजानुसार, दिल्लीत सुमारे 300 कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री झाली.

  • Que: गेल्या वर्षीच्या तुलनेत फटाक्यांच्या विक्रीत किती वाढ झाली?

    Ans: व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा फटाक्यांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली.

  • Que: दिल्ली-एनसीआरमध्ये कोणत्या फटाक्यांच्या विक्रीला परवानगी होती?

    Ans: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीएसआयआर-नीरी प्रमाणित आणि क्यूआर कोड असलेल्या ग्रीन फटाक्यांच्या विक्रीला परवानगी होती.

Web Title: Delhi diwali firecrackers sale 300 crore green cracker rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Air Pollution
  • delhi
  • Firecracker

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?
1

Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
2

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Illegal Firecracker Factory : विरारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यावर पोलिसांचा छापा! 3 जणांवर गुन्हा; 13 लाखांचा साठा जप्त
3

Illegal Firecracker Factory : विरारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यावर पोलिसांचा छापा! 3 जणांवर गुन्हा; 13 लाखांचा साठा जप्त

Air Pollution Mumbai : फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा
4

Air Pollution Mumbai : फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.