Vanuatu: ललित मोदींना मिळाले या देशाचे नागरिकत्व, दाट लोकवस्ती आणि सक्रिय ज्वालामुखी...या आहेत खास गोष्टी
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी सध्या वानुआटु देशात जाण्याच्या तयारीत आहेत. ललित मोदी यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला आहे. वृत्तानुसार, त्यांनी पॅसिफिक महासागरात स्थित असलेल्या वानुआटु या बेट देशाचे नागरिकत्व घेतले आहे. त्यामुळे ललित मोदी आता वानुआटु देशावर जाणार आहेत. हा देश त्याच्या “नागरिकता-बाय-इन्वेस्टमेंट” (CBI) कार्यक्रमासाठी ओळखला जातो.
महाकुंभमेळ्याला जाताय? केवळ त्रिवेणी संगमच नाही तर प्रयागराजमधील ‘या’ ठिकाणांनाही आवर्जून भेट द्या
ललित मोदी 2010 मध्ये भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक झाले. शुक्रवारी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पुष्टी केली की आयपीएल संस्थापका लिलत मोदी यांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला आहे. कारण त्यांना पॅसिफिक महासागरात स्थित असलेल्या वानुआटु या बेट देशाचे नागरिकत्व मिळाले आहे. ललित मोदींना ज्या देशाचे नागरिकत्व मिळाले आहे, त्या देशाबद्दल काही मनोरंजक गोष्टी आज आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
वानुआटु हा दक्षिण प्रशांत महासागरात स्थित एक बेट देश आहे. हा देश म्हणजे 83 बेटांचा समूह आहे, त्यापैकी 65 बेटांवर लोकवस्ती आहे.
हा देश ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस आणि न्यूझीलंडच्या उत्तरेस, ऑस्ट्रेलिया आणि फिजी दरम्यान स्थित आहे. त्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर “पोर्ट विला” आहे, जे इफेट बेटावर स्थित आहे.
वानुआटुमधील अधिकृत भाषा बिस्लामा (एक क्रिओल भाषा), इंग्रजी आणि फ्रेंच आहेत. बिस्लामा ही देशाची राष्ट्रीय भाषा मानली जाते.
येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, पर्यटन, मासेमारी आणि परदेशी वित्तीय सेवांवर अवलंबून आहे. याशिवाय “कावा” नावाचे एक खास पेय देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते.
वानुआटुमध्ये आयकर, भांडवली नफा कर, वारसा कर किंवा चलन विनिमय नियंत्रणे नाहीत. देशाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत म्हणजे व्हॅट (मूल्यवर्धित कर), पर्यटन आणि कृषी उत्पादनांची निर्यात हे आहेत.
वानुआटुचा सिटिझनशिप-बाय-इन्व्हेस्टमेंट (CBI) कार्यक्रम जगभरात लोकप्रिय आहे. कोणताही परदेशी व्यक्ती अंदाजे $1,50,000 अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करून येथे नागरिकत्व मिळवू शकतो. माहितीनुसार, या योजनेतून सरकारला चांगले उत्पन्न मिळते.
व्हिसा इंडेक्सनुसार, वानुआटु पासपोर्ट धारक व्हिसाशिवाय 56 देशांमध्ये प्रवास करू शकतात. म्हणूनच त्यांची नागरिकता-बाय-इन्वेस्टमेंट गुंतवणूकदारांना आकर्षित आहे.
येथील सुमारे 90% घरांमध्ये लोक स्वतः मासे पकडतात आणि खातात. याव्यतिरिक्त, त्यांच्या आहारात प्रामुख्याने स्थानिक पातळीवर पिकवलेले अन्नपदार्थ असतात, जसे की रताळे, तारो आणि गोड बटाटे.
वानुआटुमध्ये अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत, त्यापैकी “माउंट यासुर” ही जगातील सर्वात सहज उपलब्ध असलेली सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. याशिवाय, या देशात अनेक पाण्याखालील ज्वालामुखी देखील आढळतात.
2020 च्या जनगणनेनुसार, वानुआटुची एकूण लोकसंख्या 3,00,019 होती, त्यापैकी 1,51,597 पुरुष आणि 1,48,422 महिला होत्या.