
बांगलादेशमध्ये आहेत हिंदूंची प्राचीन मंदिरे! कधी तोडफोड तर कधी PAK आर्मीने शिवलिंग काढण्याचा केला होता प्रयत्न
बांगलादेशची स्थिती दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. वाढते आंदोलन आणि खराब होत असलेले वातावरण बघता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या देश सोडून पळून गेल्या. त्यातच आता बांगलादेशातील दंगली हिंदू मंदिरांपर्यंत पोचल्याचे दिसत आहे. सत्तापालटानंतर आंदोलकांनी बांगलादेशातील इस्कॉन मंदिराची तोडफोड केली आणि आग लावली. माजी पंतप्रधान हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर सर्वत्र अशांततेचे आणि भीतीचे वातावरण आहे, अशा स्थितीत बांगलादेशमध्ये गेल्या 24 तासांत अनेक हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांसाठी परिस्थिती अत्यंत अनिश्चित बनली आहे, सध्याच्या अशांततेमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात येत आहेत.
बांगलादेशातील वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर खुलना विभागातील मेहेरपूर येथील इस्कॉन मंदिराला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून आले आहे. ज्यात आंदोलकांनी या मंदिराला आग लावली आहे. या घटनेमुळे भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी या पवित्र देवतांसह मंदिराचीही नासधूस झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, या मंदिराची फार मान्यता आहे. जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा मंदिर बांधले जाण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा – Independence Day 2024: या स्वातंत्र्यदिनी भारताच्या 5 रॉयल ठिकाणांना नक्की भेट द्या
ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर हे ढाक्यातील एक हिंदू मंदिर आहे, जे खूप प्राचीन आहे. याला बांगलादेशचे ‘राष्ट्रीय मंदिर’ असेही म्हटले जाते. येथे देवी सतीच्या मुकुटाचे रत्न पडल्याचे मानले जाते. हे मंदिर 51 शक्तीपीठांमध्ये गणले जाते. येथे ढाकेश्वरी देवीची पूजा केली जाते, जी दुर्गा देवीचा अवतार मानली जाते. हे मंदिर सेन घराण्यातील राजा बल्लाल सेन याने 12 व्या शतकात बांधले होते.
चंद्रनाथ मंदिर हे बांगलादेशमधील चितगावजवळ स्थित एक प्रसिद्ध शक्तीपीठ आहे, जिथे हिंदू पवित्र ग्रंथानुसार, देवी सतीचा उजवा हात पडला होता. चंद्रनाथ मंदिर हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून अंदाजे 1,020 फूट (310 मीटर) आहे. चंद्रनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या काही कमी नाही.
पुथिया मंदिर बांगलादेशच्या राजशाही जिल्ह्यात बांधण्यात आले आहे. हे बांगलादेशातील सर्वात ऐतिहासिक मंदिरांपैकी हे एक आहे. मंदिर श्याम सागर नावाच्या तलावाभोवती बांधलेले आहे आणि मंदिराभोवती शिवसागर नावाचा खंदक आहे. पुथिया शिव मंदिर हे बांगलादेशातील सर्वात मोठे शिवमंदिर आहे. काही काळापूर्वी पाकिस्तानी लष्कराने मंदिरात असलेले शिवलिंग विस्थापित करण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना ते जागेवरून हलवता आले नाही.