
Bangladesh Violence
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या नरसिंदी जिल्ह्यात २३ वर्षीय चंचल भौमिक याची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री एक अज्ञात हल्लेखोराना चंचलच्या दुकानावर हल्ला केला. यावेळी चंचल दुकानात झोपलेला होता. हल्लेखोराने बाहेरून शटर बंद केले जेणेकरुन चंचल बाहेर पडू नये. यानंतर दुकानावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. धक्कादायक बाब म्हणजे चंचल जीव वाचवण्यासाठी ओरडत राहिला, तो आगीत होरपळत असताना हल्लेखोर बाहेरच उभा होता. चंचलच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर हल्लेखोराने तिथून पळ काढला. या घटनेने पुन्हा बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूमध्ये कट्टरपंथीयांची दहशत पसरली आहे.
चंचलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चंचल त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्या वडिलांचे निधन आधीच झाले असून घराची जबाबादारी त्याच्यावर होती. चंचला एक दिव्यांग मोठा भाऊ आणि एक धाकटा भाऊ आणि त्याची आई असा परिवार आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चंचल कष्टाळू आणि शांत स्वभावाचा होता. त्याची कोणाशीही शत्रूत्व नव्हते. तो हिंदू असल्याने कट्टरपंथीयांकडून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या हत्येची ही पहिलीच घटना नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर हिंसाचार होत आहे. ईशनिंदाच्या आरोपाखाली, हिंदूंना जबरदस्तीने अटक केली जात आहे, त्यांना मारहाण करुन त्यांना जिवंत जाळले जात आहे. डिसेंबर २०२५ मध्ये हिंदूवरील अत्याच्याराच्या ५१ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. शिवाय काही दिवसांपूर्वीच एका हिंदू तरुणाला गाडीखाली चिरडण्यात आले होते. तर त्यापूर्वी एका हिंदू पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. याशिवाय डिसेंबर २०२५ मध्ये दिपू चंद्र दास याची ईशनिंदाच्या खोट्या आरोपाखाली कट्टरपंथी जमावाने हत्या केली होती.
सध्या बांगलादेशात वाढत्या अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापले आहे. कट्टरपंथी जमावांकडून हिंदूंना थेट हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहे. तसेच सार्वजनिक सभांमध्ये गैर-मुस्लिमांना जागा मिळता कामा नये, वोट देणे हराम आहे अशा घोषणाबाजी केल्या जात आहेत. या घटनांमुळे जागतिक स्तरावर मानवाधिकार संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
Ans: बांगलादेशातील नरसिंदी भागात हिंदू तरुणाच्या हत्येची घटना घडली आहे.
Ans: बांगलादेशातील २३ वर्षीय चंचल भौमिक दुकानात झोपला होता. यावेळी मारेकऱ्याने बाहेरुन शटर बंद करुन घेतले, जेणेकरुन चंचल बाहेर जाऊ नये. यानंतर दुकानावर पेट्रोल टाकून पेटवले, भयावह बाबा म्हणजे चंचल आगीत होरपळत असताना मारेकरी बाहेरच उभा होता.