दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला केला जातो. हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून ओळखला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.या दिवशी लोक ध्वजारोहण, परेड, सांस्कृतिक कार्यक्रमांसह देशभक्तीपर गाणी गातात. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी एक अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. मात्र यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही आणखीन खास करू शकता. यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत काही खास ठिकाणांना भेट देऊ शकता.

या स्वातंत्र्यदिनी तुम्ही आग्रा किल्ल्याला भेट देण्याचा विचार शकता. हा किल्ला मुघल स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. आग्रामध्ये, तुम्ही मोती मशीद, दिवाने आम आणि दिवाने खास, ताजमहाल यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. स्वातंत्र्यदिनी तुम्हाला येथे अनेक चांगल्या परेड पाहायला मिळतील.

स्वातंत्र्यदिनी तुम्ही जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यालाही भेट देण्याचा विचार करू शकता. हा किल्ला येथील वास्तुकला आणि सुंदर दृश्यासाठी ओळखला जातो. या जागी तुम्ही अनेक राजवाडे, मंदिरे आणि संग्रहालये पाहू शकता. जर तुम्हाला तुमच्या मुलांना इतिहासाशी निगडीत काही दाखवायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
हेदेखील वाचा – ‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात लांब रेल्वे मार्ग! प्रवास इतका मोठा की दिवस कमी पडतील

जर तुम्ही मुंबईचे रहिवासी असाल तर स्वातंत्र्यदिनी मुंबईजवळील ठिकाण भेट देण्यासाठी शोधत असाल तर तुमच्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान एक चांगला पर्याय ठरेल. याच मैदानात गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो बिगुल वाजवण्यात आले होते. तुम्ही तुमच्या कुटुंबासह याजगेला मैदानाला भेट देण्यासाठी येथे येऊ शकता.

याशिवाय तुमच्याकडे चंद्रशेखर आझाद पार्कला भेट देण्याचा पर्याय आहे. तुमच्या कुटुंबियांसह किंवा मित्र-मैत्रिणींसह तुम्ही या जागेला भेट देऊ शकता. 1931 मध्ये चंद्रशेखर आझाद ब्रिटिश सैनिकांशी लढले. चंद्रशेखर आझाद यांनी वयाच्या 25 व्या वर्षी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले.
![]()
जालियनवाला बागबद्दल तुम्ही ऐकले असावे. 1919 मध्ये बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बागेत स्वातंत्र्यसैनिकांनी रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी सभेचे नियोजन केले होते. यानंतर असे आदेश देण्यात आले की जेव्हा जेव्हा लोक येथे येतील तेव्हा कोणतीही सूचना न देता गोळ्या झाडल्या जातील. आजही या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात.






