Stressful Cities: हृदय कमकुवत असेल तर या शहरांना कधीही भेट देऊ नका, साहस प्रेमींसाठी खास
शरीर आणि मन प्रसन्न करण्यासाठी प्रवास हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. प्रवास किंवा बाहेर राहणे प्रत्येकामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करते. यामुळे आत्मविश्वास वाढतो. तसेच नवीन संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते. एकंदरीत, प्रवासाचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो, परंतु अधूनमधून प्रवास केल्याने तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता हे तुम्हाला माहिती आहे का?
जगात अशी काही ठिकाणे आहेत जी लोकांमध्ये त्यांच्या वातावरणामुळे, परिस्थितीमुळे किंवा वैशिष्ट्यांमुळे तणाव किंवा चिंता निर्माण करू शकतात. येथे जाण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यांना स्ट्रेसफुल सिटीज (Stressful Cities) म्हणून ओळखले जाते. चला तर मग यात कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते जाणून घेऊयात.
माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प,नेपाळ
माउंट एव्हरेस्टचे नाव ऐकले की, सर्वात प्रथम मनात येते ती म्हणजे रोमांच आणि साहस. मात्र, हे ठिकाण केवळ साहसांसाठी प्रसिद्ध नाही. इथे आल्यानंतर तुम्हाला ताण येऊ शकतो. उंची, ऑक्सिजनची कमतरता आणि हवामानातील बदल यामुळे हे ठिकाण एक आव्हानात्मक आहे.
मुंबई
जगभरातील धकाधकीच्या शहरांमध्येही मुंबईच्या नावाचा समावेश आवर्जून येतो. येथे होणारी गर्दी आणि प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे लोक अनेक गंभीर आरोग्य समस्या आणि मानसिक तणावाचे बळी ठरत आहेत.
डेथ रोड, बोलीविया
बोलिव्हियाचा ‘डेथ रोड’ हा जगातील सर्वात धोकादायक रस्ता मानला जातो. येथे अरुंद मार्ग, खोल खड्डे आणि जोरदार वारे तुम्हाला प्रत्येक क्षणी सतर्क राहण्यास भाग पाडतात. ज्यांना साहसाची आवड आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण आकर्षक असू शकते, परंतु कमकुवत हृदय असलेल्यांना येथे न जाण्याचा सल्ला दिला आहे.
काबुल
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलचे नाव जगातील सर्वात तणावपूर्ण शहरांमध्ये आहे. येथील लोकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने लोकांमध्ये तणाव वाढला आहे. त्याचबरोबर येथे जाणाऱ्या प्रवाशांनाही तणावाचा सामना करावा लागू शकतो.
अंटार्क्टिका
अंटार्क्टिका हे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथे सहा महिने सूर्य उगवत नाही. येथील बर्फाळ वाळवंट मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते.