भारतातील 'या' शहराला 'Paris Of India' म्हणून ओळखले जाते, जाणून घ्या काय आहे खास?
पॅरिस ‘सिटी ऑफ लव्ह’ म्हणून हे शहर अनेकांच्या पसंतीचे आहे. विशेष म्हणजे प्रेमीयुगलांमध्ये हे ठिकाणी खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतात देखील असे एक शहर आहे, ज्याला ‘भारताचे पॅरिस’ म्हणून ओळखले जाते. तुम्ही विचार करत असाल की असे कोणते शहर आह. तसे तर भारतातील प्रत्येक शहराची एक खास ओळख आहे. प्रत्येक शहराची संस्कृती अगदी वेगळी आहे. पण काही शहरे खूपच खास आहे. आता हेच बघा ना पिंक सिटी म्हणून ओळखले जाणारे शहर जयपूर किती खास आणि अनोखे आहे.
भारताचे पॅरिस
पण तुम्हाला माहित आहे का जयपूरलाच पॅरिस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. जयपूरचे रंगीबेरंगी रस्ते, ऐतिहासिक वास्तू, भव्य महाल आणि समृद्ध संस्कृती यामुळे हे शहर खास ठरते. पॅरिसप्रमाणेच जयपूरलाही त्याच्या अप्रतिम वास्तुशिल्पासाठी ओळखले जाते. जशी जगातील सुंदर शहरामध्ये पॅरिसची गणना केली जाते तसेच जयरपूरही त्याच्या प्राचीन कला आणि पंरपरेसाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. पॅरिसमधील राजवाडे, बाजारपेठा प्रसिद्ध आहे. पॅरिस त्याच्या भव्य इमारतीसाठी प्रसिद्ध तसेच जयपूरही आहे. जसे पॅरिस प्रेमींसाठी हनिमून डेस्टिनेशन आहे तसेच जयपूरही भारतात हनिमूनसाठी लोकप्रिय आहे.
फोटो सौजन्य: iStock
जयपूरचा इतिहास
जयपूरची स्थापना महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी 1727 साली केली. हे शहर पूर्ण होण्यास चार वर्षांचा कालावधी गेला. जयपूरची रचना शास्त्रीय नियोजनावर आधारित आहे. या शहराची वास्तुकला प्राचीन काळाची झलक दाखवते. सिटी पॅलेस, हवा महल, नाहरगड किल्ला, आणि जयगड किल्ला या ठिकाणांची प्रसिद्धी देशभर पसरली आहे. जयपूरमधील जयगड किल्ल्यात जगातील सर्वात मोठी तोफ बघायला मिळते.
आमेर किल्ला, जयपूर (फोटो सौजन्य: iStock)
आकर्षक पर्यटन स्थळे
जयपूर शहरात अनेक आकर्षक अशी पर्यटने स्थळे आहे. येथील आमेर किल्ला, जय महल, हवा महल आणि सिटी पॅलेस पर्यंटकांना भूरळ घालतात. याशिवाय, चांदपोल, बाजार, बडा बाजार, आणि जौहरी बाजार ही ठिकाणं स्थानिक कलाकुसरीशी परियचय करून देतात. जयपूरचा बाजारप्रवास खरेदीप्रेमींसाठी अनोखा अनुभव ठरतो. या ठिकाणी कुंदन, मीना आणि मोत्यांची दागदागिने स्थानिक कारागीरांच्या कुशलतेचं प्रतीक आहेत.
हवा महल, जयपूर (फोटो सौजन्य: iStock)
व्हॅलेंटाईन वीकसाठी लोकप्रिय
जयपूर हे शहर प्रेमी जोडप्यांसाठी कूप प्रसिद्ध आहे. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान हे शहर प्रेमी युगलांनी गजबजलेले असते. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत येथे छान वेळ घालवता येईल. हे शहर हनीमूनसाठी योग्य डेस्टिनेशन मानले जाते. यामुळे जयपूरचा ऐकिहासिक वारसा आणि भारताच्या या पॅरिसला एकदा तरी नक्की भेट द्या.
हे देखील वाचा- IRCTC चा धमाकेदार टूर पॅकेज: कमी खर्चात घ्या दुबई आणि अबू धाबी फिरण्याचा आनंद