समुद्री इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचा साक्षीदार आहे भारतातील 204 लाईटहाऊस! सुंदरता अशी की पाहतच राहाल
भारतात पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलतं आहेत. भारतातील पर्यटन वाढावं यासाठी अनेक उपक्रम देखील राबवले जात आहेत. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. कारण या पर्यटनस्थळांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. असंच सध्या प्रसिद्ध होत असलेलं पर्यटनस्थळ म्हणजे भारतातील 204 लाईटहाऊस. भारतातील हे 204 लाईटहाऊस सध्या एक भव्य आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.
places for senior citizens: रिटायरमेंटनंतर भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या, आनंद होईल द्विगुणित
भारतातील एक मोठे पर्यटन क्षेत्र म्हणजे लाईटहाऊस पर्यटन. देशाच्या 7,500 किमी पेक्षा जास्त लांबीच्या किनारपट्टीवर स्थित 204 लाईटहाऊस केवळ सागरी प्रवासांना सुरक्षित मार्गदर्शनच देत नाहीत तर देशाच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहेत.
शासनाच्या दूरदर्शी उपक्रमामुळे ही ऐतिहासिक लाईटहाऊस आता पर्यटनस्थळे म्हणून विकसित होत आहेत. त्यांच्या ऐतिहासिक आणि वास्तुशिल्प वारशाचे जतन करणे, तसेच स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि समुदायांना सशक्त करण्यासाठी त्यांचा वापर करणे ही या उपक्रमामागील कल्पना आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
लाइटहाऊस पर्यटन देशाच्या पर्यटन नकाशावर एक नवीन अध्याय तर जोडत आहेच, परंतु स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण करत आहे. तसेच, हे पर्यटकांना एक अद्भुत अनुभव देत आहे, जिथे त्यांना इतिहास, निसर्ग आणि सागरी जीवनाचे मिलन पाहता येणार आहे. लाइटहाऊस पर्यटन एक नवीन अध्याय घेऊन येणार आहे, ज्यामुळे विदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना इतिहासाबद्दल माहिती मिळण्यासाठी मदत होणार आहे.
लाइटहाऊस पर्यटनामध्ये लाइटहाऊस आणि त्यांच्या सभोवतालच्या परिसराचे सुंदर पर्यटन स्थळांमध्ये रुपांतर केलं जाणार आहे. या प्रचंड वास्तू, अनेकदा उंच उंच कडांवर, वालुकामय किनाऱ्यावर किंवा दुर्गम बेटांवर वसलेल्या, केवळ नाविकांसाठी मार्गदर्शकच नाहीत तर आता पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहेत. या ठिकाणी पोहोचून पर्यटक केवळ नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासोबतच सागरी इतिहासाची माहिती घेण्याचीही संधी मिळणार आहे.
Year Ender 2024: फॅमिली वेकेशनसाठी भारतातील या 10 ठिकाणांना मिळाली पहिली पसंती, तुम्ही भेट दिली का?
सांस्कृतिक वारसा: लाइटहाऊस हे भारताच्या सागरी वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या वास्तू केवळ सागरी व्यापाराचा इतिहासच सांगत नाहीत तर स्थानिक संस्कृती आणि जीवनशैलीचेही प्रतिनिधित्व करतात.
पर्यटनाला चालना: भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी लाइटहाऊस पर्यटनाची विशेष भूमिका आहे. ही साइट्स देशाच्या वेगवेगळ्या भागात आहेत आणि पर्यटकांना विविध अनुभव देतात.
स्थानिक अर्थव्यवस्था: लाइटहाऊस पर्यटन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करते. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन परिसराचा विकास होतो.
सस्टेनेबल पर्यटन: सस्टेनेबल विकासाच्या तत्त्वांनुसार लाइटहाऊस पर्यटन विकसित केले जात आहे. पर्यावरणाचे रक्षण करून पर्यटनाला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे.
भारत सरकार लाइटहाऊस पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. सरकार ‘मरीन इंडिया व्हिजन 2030’ आणि ‘अमृत कल व्हिजन 2047’ सारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत या साइट्स विकसित करत आहे.