Winter Travel: या 5 देशांमध्ये अनेक महिने होत नाही रात्र, इथे घेऊ शकता 'Midnight Sun' चा अद्भुत अनुभव
आपल्या दिवसाची सुरुवात ही सूर्याच्या उजळण्याने होत असते. सूर्य उगवला की दिवस सुरु झाला असे आपण मानतो. मात्र विचार करा जर सूर्य कित्येक महिने उगवलाच नाही तर… लहानपणी प्रत्येकाने सूर्य उगवला नाही तर? यावर निबंध लिहिला असावा. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, ही एक कल्पना नसून खरंतर जगात असे काही देश आहेत जिथे खरोखर सूर्य उगवत नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे!
जगात असे अनेक देश आहेत जिथे वर्षातील काही महिन्यांत सूर्य चमकत असतो. या विशेष घटनेला ‘मध्यरात्रीचा सूर्य’ (Midnight Sun) म्हणतात. मध्यरात्री सूर्याची घटना पृथ्वीच्या झुकण्यामुळे होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा तिचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव सूर्याकडे झुकतात. या कारणास्तव, वर्षाच्या काही महिन्यांत, या भागात दिवस खूप मोठे आणि रात्री खूप लहान होतात. चला जाणून घेऊया त्या 5 देशांबद्दल जिथे मिडनाइट सनचा जादुई अनुभव घेता येतो.
नॉर्वे (Norway)
नॉर्वे हा मिडनाइट सनच्या भूमीचा देश म्हणून ओळखला जातो. येथे मे ते जुलै अखेरपर्यंत सुमारे 76 दिवस सूर्य सतत चमकत असतो. नॉर्वेची स्वालबार्ड बेटे या बाबतीत आघाडीवर आहेत. येथे 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत सूर्य सतत चमकत राहतो. नॉर्वेमधील मिडनाइट सनचा अनुभव घेण्यासाठी दूरदूरवरून लोक इथे येत असतात. यंदाच्या हिवाळ्यात तुम्हीही नॉर्वेच्या फजोर्ड्स, ग्लेशियर्स आणि हिरव्यागार दऱ्यांमध्ये या जादुई गोष्टीचा अनुभव घेऊ शकता.
आइसलँड (Iceland)
आईसलँड हे देशदेखील मिडनाइट सनसाठी फार प्रसिद्ध आहे. येथे जून महिन्यात सूर्य सतत उर्जावान असतो. आइसलँडमध्ये तुम्ही ज्वालामुखी, धबधबे आणि बर्फाच्छादित पर्वतांमध्ये मिडनाइट सनचा आनंद घेऊ शकता.
फिनलंड (Finland)
मिडनाईट सनचा जादुई अनुभव फिनलंडमध्येही घेता येतो. येथे 73 दिवस सूर्य सतत तळपतो. फिनलंडमध्ये तुम्ही हजारो तलाव, जंगले आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये मिडनाइट सनचा आनंद घेऊ शकता.
भारतात अशी काही गावांची नावे आहेत जी सांगताना लोकांना वाटते लाज, कल्पनाही करू शकणार नाही
स्वीडन (Sweden)
स्वीडनचा लॅपलँड प्रदेश मिडनाइट सनसाठी देखील ओळखला जातो. वर्षातील जवळपास 100 दिवस येथे सूर्यास्त होत नाही. लॅपलँडमध्ये तुम्ही सांताक्लॉजच्या भूमीला भेट देऊ शकता आणि नॉर्दर्न लाइट्सचा आनंदही घेऊ शकता.
अलास्का (Alaska)
ज्या देशांमध्ये मिडनाइट सनची घटना घडते त्या देशांमध्ये अलास्काचाही समावेश आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून ते जुलैच्या अखेरीस येथे सूर्य मावळत नाही. अलास्कामध्ये तुम्ही बर्फाच्छादित पर्वत, हिमनदी आणि जंगलांमध्ये मिडनाइट सनचा आनंद घेऊ शकता. हा अद्भुत अनुभव तुमच्या नक्कीच तुमच्यासाठी संस्मरणीय राहील