कल्याण भिवंडी परिसरात चोरट्याचं सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे, याच पार्श्वभूमीवर ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा द्वारा सराईत मोबाईल चोर शेरआली याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटार सायकल, चोरलेली मोबाईल असा २ लाख ४५ हजार १९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १२ चोरीच्या गुन्ह्याची कबुली घेतली आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेरआली उर्फ पिल्या इमाम फकीर चोरीची मोटार सायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटार सायकल आणि १० मोबाईल आढळले. त्याला ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता चोरीची मोटार सायकल आणि विविध कंपनीचे ११ मोबाईल असा २ लाख ४५ हजार १९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे १४ गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथकाने १२ गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात ११ मोबाईल चोरीचे गुन्हे आणि एक वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.