महाराष्ट्रातील शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्री, मोफत वाटप आणि जाहिरातींवर एफडीएने पूर्णपणे बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. अहिल्यानगर शहरातील प्रमुख शाळांबाहेर आजही जंक फूड, चाट सेंटर आणि तळलेल्या पदार्थांच्या गाड्या सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागाचे अधिकारीच या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आता अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासन विभाग यावर ठोस कारवाई करणार की ही बंदी केवळ कागदावरच राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शाळांबाहेरून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी…