अंबरनाथ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली. पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात पोलिसांनी धाड टाकून काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. यामध्ये १३७ ग्रॅम गांजा, कोडेन फोस्फेट नावाच्या दोन सीलबंद औषधांच्या बाटल्या पोलिसांनी कारवाई दरम्यान जप्त केल्या. मात्र या अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची तक्रार करणाऱ्या प्रवीण गोसावी यांनी पोलिसांच्या या कारवाईवरचं शंका उपस्थित केली आहे. तक्रारदार गोसावी यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पोलीस उपयुक्तांना देताच तत्परतेने गुरुवारी रात्री धाडसत्र राबवुन पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाच्या प्रमाणावर गोसावी यांनी शंका उपस्थित केली आहे, तर स्थानिक पोलिसांना पूर्वीपासूनच या सर्व अवैध धंद्यांची माहिती असल्याचा देखील गंभीर आरोप केला आहे.