अंबरनाथमधील लादी नाका परिसरात भरधाव टेम्पोने सायकलस्वार निवृत्त नौदल अधिकारी शिवप्रसाद गौड यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या गौड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टेम्पोने दोन रुग्णवाहिकांनाही जोरदार धडक दिली होती. अपघातानंतर फरार झालेल्या टेम्पो चालकाने वाहनाचा रंग बदलून ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी भिवंडीत त्याला अटक केली.