राणा दाम्पत्याला जामीन मंजूर होताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष
थेट मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार या वादावरून आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तब्बल बारा दिवसानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करुन दिलासा दिला. यावेळी अमरावती येथील गंगा सावित्री निवासस्थानावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राणा यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाही दिल्या.