धुळ्यातील पिंपळनेर शहरात तीन दिवसामध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पिंपळनेर येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात रात्रीच्या सुमारास सुरेश गोकुळ मालुसरे या एस.वाय मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यान खळबळ उडाली आहे. सुरेशने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये रुमालाच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, घटनेनंतर पोलिस प्रशासन, मयताचे नातेवाईक दाखल झाले असून नातेवाईकांनी वसतिगृहातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.