पुण्यातील रेव्ह पार्टीबाबत राजकाणातील वातावरण चांगलच तापलं असल्याचं दिसत आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू आहे याच्यावरून मला असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज येत होता. जी पुण्यामध्ये घटना घडली त्याबाबत माझं जावयांशी बोलणं झालेलं नाही ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात झालेली खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीच्या समर्थन कदापि करणार नाही, पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असं होतं की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणांमध्ये तथ्य असेल जावई असो किंवा कोणी असो त्याचा समर्थन कधी करणार नाही परंतु जर जाणून-बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.